कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा

कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा

अधिवक्ता परिषद माणगाव सिद्धेश डान्स अकॅडमी व स्व.अशोकदादा साबळे विधी यांच्या संयुक्त विद्यमाने सोहळा सपन्न 
✍️ दिलीप करकरे ✍️
माणगाव तालुका प्रतिनिधी
📞7208708456📞

माणगाव : अधिवक्ता परिषद माणगाव तसेच सिद्धेश डान्स अकॅडेमी व स्व.अशोकदादा साबळे विधी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित महिलादिनी विशेष कतृत्वावान महिला सन्मान सोहळा प्रसंगी माजी पंचायत समिती सदस्या सौ. रचना निलेश थोरे यांचा कर्तृत्ववान महिला म्हणून सन्मान करण्यात आला.
प्रसंगी महिलांना मार्गदर्शन करण्यासाठी जिल्ह्यातील नामांकित वकील व अलिबागच्या मा.उपनगराध्यक्ष ऍड.मानसीताई म्हात्रे,शिवसेना प्रवक्ते ऍड.राजीवजी साबळे,ऍड.महेंद्रजी मानकर,जेष्ठ विधितज्ञ ऍड.घायाळ सर,ऍड.योगेशजी तेंडुलकर,सिद्धेश डान्स अकॅडमीच्या ऍड.स्वागता वाडकर प्रामुख्याने उपस्थित होते तर यावेळी नगरपंचायत माणगांवच्या नगराध्यक्षा श्रीम.शर्मिला सुर्वे मॅडम,स्वच्छता सभापती श्रीम.सुशीलाकाकी वाढवळ,महिला बालकल्याण सभापती सौ.नंदिनीताई बामुगडे,CBSC स्कुलच्या चेयरमन सौ.निकिताजी साबळे,श्रीम.संगीताताई उतेकर व अन्य कर्तृत्ववान महिलांचा देखील आपआपल्या क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करीता सन्मान करण्यात आला.यावेळी तीनही सहयोगि संस्थांचे पदाधिकारी व महाविद्यालयीन विद्यार्थिनी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या,सौ.रचना थोरे यांनी आपल्या पंचायत समिती कार्यकाळात केलेल्या उल्लेखनीय सामाजिक व शैक्षणिक कामगिरीमुळे त्यांचा हा सन्मान करण्यात आला.