कोलाड येथील भागांर गोदामाला भीषण आग,

कोलाड येथील भागांर गोदामाला भीषण आग,

चार तासानंतर आग नियंत्रणात. आगीच्या घटनेला जबाबदार कोण?

✍️तेजपाल जैन ✍️
कोलाड प्रतिनिधी
📞8928847695

रोहा :- रोहा तालुक्यातील कोलाड भिरा फाट्यावरील भंगारसाठा गोदामाला सोमवारी दुपारच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. लागलेल्या आगीने क्षणातच रुद्र्रुप धारण केले हा म्हणता म्हणता आगीचे तांडव सर्विकडे दिसू लागले. आगीने मोठे रुद्ररूप धारण केल्याने धुराची कोंडी भिरा फाटा तसेच परिसरातल्या वस्तीत पसरताच सर्वत्र एकच खळबळ उडाली नागरिकांची काही काळ धुराने कोंडी केल्याचे दिसून आले.तर ही घटना समजताच कोलाड पोलीस घटनास्थळी दाखल झाले.भयानक लागलेल्या आग नियंत्रण करण्यासाठी अथवा आटोक्यात आणण्यासाठी अखेर रोहा नगर परिषदेच्या अग्निशमन बंबला पाचारण करावे लागले तसेच विविध सामाजिक संस्था मुंबई गोवा महामार्गावर काम करत असलेल्या कल्याण टोल कंपनीचे पाण्याचा टँकर तसेच विजय राजिवले यांचा पाण्याचा टँकर आणि स्थानिक एस व्ही आर एस एस रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण करण्यासाठी अनेक ग्रामस्थ नागरिकांनी अथक प्रयत्न सुरू केले आणि तदनंतर तीन चार तासाने ही भीषण आग आटोक्यातआल्याचे समजले. मात्र या दुर्दैवी आगीच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून या घटनेला जबाबदार कोण असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

सदरच्या घटनेची सविस्तर प्राथमिक माहिती अशी की मुंबई गोवा महामार्गावर कोलाड भिरा फाटा येथील भंगारसाठा गोदामात भांगराला आग लागली आणि त्यानंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली भर वस्तीच्या ठिकाणी भंगाराचे मोठ मोठे साठे यावर नियंत्रण कोणाचे कोणाचे वरदहस्त यावरच आता पुन्हा प्रश्न चिन्ह निर्माण झाला असल्याचे सर्वत्र बोलले जात आहे.तर लागलेल्या आगीत सुदैवानं कोणतीही दुर्घटना घडली नाही परंतु अशा भंगाराच्या डेपो मागे नक्की दडलंय काय तर दिवसेंदिवस असेच भंगाराचे साठे वाढत चालले आहेत यावर देखील दुर्लक्ष केले जात आहे या पूर्वी याच मार्गावरी पुई हद्दीत देखील भंगार जाळ पोळ करत असताना दुर्दैवी घटना घडली होती तर ती आग नियंत्रणास आणण्यास अनेक फायर ब्रिकेट बंब ना पाचारण करण्यात आले होते तर त्यावर नियंत्रण मिळविण्यास अग्निशमन दल आणि टीम ला तब्बल सात ते आठ तासांहून अधिक काळ लागला होता मात्र पुन्हा ही आग पाहता त्याच आठवणी जाग्या झाल्या आणि बहुतांशी नागरिकांची धागधुकी वाढल्याचे पहावयास मिळत होते मात्र या लागलेल्या आगीवर मोठ्या प्रसंग सावध राखत नियंत्रण मिळवण्यास यश आले.

भंगाराच्या साठा गोदामाला आग लागलीची घटना समजतात कोलाड पोलीस निरीक्षक नितीन मोहिते अंमलदार नरेश पाटील हे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले आणि सदरच्या आगीवर नियंत्रण केले मात्र आगीचे कारण समजू शकले नाही मात्र आगीवर पूर्ण नियंत्रण आले असल्याची माहिती मोहिते यांनी देत पुढील अधिक तपास चालू असल्याचे सांगितले तर अशा घटनांवर ठोस उपाय योजना पुढील काळात करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.