ठेकेदारांच्या गळयाशी आली लाडकी बहिण योजना.

ठेकेदारांच्या गळयाशी आली लाडकी बहिण योजना.

कोटयवधींची बीले अडकल्याने ठेकेदार आत्महत्येच्या तयारीत.

रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३

अलिबाग:- राज्य सरकारची आर्थिक परिस्थाती ठीक नसल्याने राज्यभरातील ठेकेदारांची कोटयवधींची बीले अडकली असून ठेकेदारांच्या संघटनेने राज्यातील सर्व विकासाची कामे दि. 5 फेब्रुवारी 2025 रोजी बंद केली असल्याची माहिती आज अलिबाग येथे महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय रायगड येथे आयोजित केलेल्या मोर्च्याच्या वेळी देण्यात आली.
यावेळी ठेकेदार संघटनेच्या पदाधिका-यांनी त्यांचा सर्व राग शांसनाच्या लाडक्या बहिण योजनेवर काढून या योजनच्या अंमलबजावणीसाठी दर महिना 30 ते 35 हजार कोटी खर्च करावे लागतात. ठेकेदारांचे 45 हजार कोटी देणे बाकी असताना शासन फसव्या घोषणा करीत आहेत.
ठेकेदारांवर उपाशी मरायची पाळी आली आहे. जसे शेतकरी आत्महत्या करतात तशी वेळ ठेकेदारांवर शासनाने आणली आहे. स्थानिक आमदारांनी अव्वाच्या सव्वा कामे राज्याचे आर्थीक बजेट काय याचा विचार न करता मंजूर करून आणली. आता केलेल्या कामांचे पैसे देण्यास टाळाटाळ होत आहे. आता आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही असा सुर उपस्थित ठेकेदारांनी लावला होता. यावेळी महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाचे अध्यक्ष प्रकाश पालरेचा, रायगड विभागीय अध्यक्ष राजू पिचीका, अमीर उर्फ पिंटया ठाकूर, सचिन मोरे, अनिरूध्द पाटील, इ. उपस्थित होते. ठेकेदारांपैकी बहुतेक सर्व जण कोणत्या ना कोणत्या राजकीय पक्षाची संबधीत होते. त्यामुळे सत्ताधारी पक्षाच्या ठेकेदारांच्या उपस्थितीत सरकारवर टिकेची झोड उठविली जात असल्याने जनतेमधून आच्छर्या व्यक्त केले जात होते.