गुरुकुल प्री प्रायमरी शाळेत महिला दिनानिमित्त विविध स्पर्धा
✍️लुकेश कुकडकर✍️
गडचिरोली तालुका प्रतिनिधी
मो 8999904994
गडचिरोली:- जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून चामोर्शी रोड गडचिरोली येथील गुरुकुल प्री प्रायमरी शाळेत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. प्रणिता मेश्राम सहा. प्राध्यापक शासकीय विज्ञान महाविद्यालय गडचिरोली उपस्थित होत्या. महिला पालकांसाठी रांगोळी स्पर्धा व डिश डेकोरेशन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. अनेक महिलांनी उत्स्फूर्त पणे सहभाग घेतला. डॉक्टर प्रणिता मेश्राम यांनी महिलांमधल्या कलागुणांना वाव देऊन घराच्या बाहेर निघून प्रयत्न करण्याचे मार्गदर्शन केले. बाहेरचं जग खूप सुंदर आहे. आपण बाहेर निघून त्याचा आनंद घेतला पाहिजे असे मार्गदर्शन शाळेच्या प्राचार्या रेणुका गव्हारे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशासाठी शाळेच्या शिक्षिका वर्षा मेश्राम, शिल्पा राऊत व श्रद्धा यांनी प्रयत्न केले.
