क्रीडाभुवन, अलिबाग संस्थेच्या आरसीएफ सीएसआर अंतर्गत सौर उर्जा प्रकल्पाचे उद्घाटन

क्रीडाभुवन, अलिबाग संस्थेच्या
आरसीएफ सीएसआर अंतर्गत
सौर उर्जा प्रकल्पाचे उद्घाटन

रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:- अलिबाग शहराच्या निसर्गरम्य समुद्रकिनारी गेली १०० वर्षे क्रीडाक्षेत्रात कार्यरत असलेल्या क्रीडाभुवन संस्थेच्या सौर उर्जा प्रकल्पाचे उद्घाटन जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय केमिकल्स अॅण्ड फर्टिलायझर्स लि.. थळचे कार्यकारी संचालक मा. नितिन हिरडे यांच्या शुभहस्ते क्रीडाभुवन संस्थेच्या ‘संध्याछाया’ ज्येष्ठ नागरिक उद्यानात संपन्न झाले. या सौर उर्जा प्रकल्पासाठी आरसीएफ सीएसआर अंतर्गत निधी देण्यात आला आहे.

या समारंभाला आर.सी.एफ.चे महाव्यवस्थापक संजीव हरळीकर (एच. आर.) उप महाव्यवस्थापक विनायक पाटील, जनसंपर्क अधिकारी डॉ. राकेश कवळे तसेच अलिबाग ज्येष्ठ नागरिक संस्थेचे अध्यक्ष प्रफुल्ल राऊत, उपाध्यक्षा सौ. चारूशीला कोरडे, सचिव नंदकुमार तळकर, आर. के. घरत, सावतामाळी पतसंस्थेचे अध्यक्ष रमेश नाईक, श्री विठोबा देवस्थानचे ट्रस्टी सुरेंद्र जोशी, अविनाश राऊळ आणि अलिबाग शहरातील प्रतिष्ठित नागरिक, खेळाडू, संस्थेचे सदस्य उपस्थित होते.

क्रीडाभुवन संस्थेतर्फे मा. नितिन हिरडे यांचा संस्थेचे प्रमुख विश्वस्त उदय जोशी यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व ‘संध्याछाया’ उद्यानात उभारण्यात आलेल्या शिल्पाकृतीची प्रतिकृती भेट देऊन सत्कार करन्यात आला.

यानंतर क्रीडाभुवन संस्थेतर्फे घेण्यांत आलेल्या रायगड जिल्हा पातळीवरील बॅडमिंटन स्पर्धाचा शुभारंभ नितिन हिरडे यांचे शुभहस्ते करण्यांत आला. संध्याछाया उद्यानातील नवनिर्मित शिल्पाकृती तयार करणाऱ्या गजानन रामनाथकर यांचा सत्कार नितिन हिरडे यांच्या हस्ते करण्यात आला.