हैदराबादने गाठले विजयाचे ‘शिखर’

52

 

हैदराबाद:

हैदराबाद सनरायजर्स आणि राजस्थान रॉयल्स या संघांमध्ये आज रंगलेल्या सामन्यात हैदराबादने राजस्थानवर ९ गडी राखून दणदणीत विजय मिळवला आहे. सलामीवीर शिखन धवनने केलेल्या नाबाद ७७ धावांच्या झुंजार खेळीमुळे हैदराबाद संघाला सहज यश मिळवता आले.

सनरायजर्स हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हैदराबाद संघातील गोलंदाजांनी कमालीची कामगिरी करत राजस्थान रॉयल्सच्या फंलदाजांना चांगलेच आव्हान दिले. हैदराबाद संघाच्या आक्रमक गोलंदाजीसमोर राजस्थान रॉयल्सना केवळ १२५ धावा बनवणे शक्य झाले.