मौजा जवाहरनगर येथील श्रीराम उत्सव समिती ठाणा येथे दोन दिवसीय जन्मोत्सव सोहळा
✍ भवन लिल्हारे ✍
भडारा उपजिल्हा प्रतिनिधी
मीडिया वार्ता न्युज
8308726855,8799840838
जवाहरनगर :- भंडारा जिल्ह्यातील जवाहरनगर येथील श्रीराम नवमी उत्सव समीती ठाणा येथे दिनांक ९ व १० एप्रिल २०२२ शनिवार व रविवार असे दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा श्रीराम जन्मोत्सव सोहळा ह.भ.प. शामराव फटींग महाराज गायत्री शक्तीपीठ जवाहरनगर करीत आहे. तरीपण या कार्यक्रमात जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक मंडळाने केला आहे.
सकाळी ४:३० वाजता ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहेत. व संपूर्ण जवाहरनगर वासी व ठाणा वासी यांनी आपापल्या घराच्या समोर रांगोळी बनवावी असी अपील देखील केली आहे. सकाळी ९:०० वाजता प्रीराम चरित मानस अखंड रामायण पाठ होईल अशी घोषणा देखील केली आहे. यावेळी श्रीराम भरोसे संजय मंडळ ठाणा, श्रीराम रामायण मंडळ जवाहरनगर, विठ्ठल महिला भजन मंडळ ठाणा, माँ भगवती भजन मंडळ विवेकानंद कॉलनी ठाणा यांचे या श्रीराम नवमी कार्यक्रम सोहळ्यात सहभागी होणार आहेत.
सायंकाळी ६:०० वाजता सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले असुन उद्घाटक म्हणून मा. नरेंद्र भोंडेकर आमदार भंडारा यांचे हस्ते करण्यात येणार आहे अशी घोषणा देखील केली आहे. दिनांक १० एप्रिलला सकाळी १० वाजता अखंड रामायण पाठ समाप्ती, १२:०० वाजता श्रीराम जन्मोत्सव सोहळा, पाळणा, आरती यांचा सहभाग असणार आहे. दुपारी २:०० ते ७:०० वाजे दरम्यान महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होईल. कार्यक्रमात रामभक्तांनी जास्तीत जास्त संख्येत उपस्थित राहावे असे आवाहन डॉ. दिलीप फटीक, अध्यक्ष इंद्रजित कुर्झकर, कार्याध्यक्ष राम थोटे, लक्ष्मण थोटे, उपाध्यक्ष सुनील निलेवार, सचिव संदीप ठवकर, कोषाध्यक्ष बलीराम कुकवासे यांनी केले आहे. गावात या श्रीराम नवमी मध्ये उत्साहाचे वातावरण दिसणार आहे. असे आयोजक मंडळानी सर्व जनतेस, व येणाऱ्या संपूर्ण भजन मंडळास विनंती केली आहे.
१) चैत्र शुद्ध नवमी हा दिवस हिंदू पंचांगानुसार अत्यंत महत्वाचा दिवस
२) या तिथीला भगवान विष्णूचा सातवा अवतार समजल्या जाणाऱ्या प्रभू रामचंद्रांचा जन्म झाला होता.
३) म्हणून या दिवसाला रामनवमी असे म्हणतात.
४) ज्याप्रमाणे कृष्णाचा जन्म रात्री १२ वाजता झाला असे म्हणतात. त्याप्रमाणे प्रभू श्रीरामाचा जन्म सुर्य डोक्यावर आल्यावर म्हणजे दुपारी १२ वाजता झाला.
५) सर्व साधारणपणें प्रभू रामचंद्राच्या मूर्तीला हळद कुंकू वाहिले जाते.
६) त्यानंतर फुले वाहिली जातात. श्रीरामाला केवडा, चंपा, चमेली, आणि जुईची फुले वाहिली जातात.
७) त्यानंतर त्याची आरती केली जातात. आणि या दिवसी रामजन्म पाळणा अगदी हमखास गायिला जातो.
अशी प्रेरणा ह.भ.प. शामराव फटींग यांनी आपल्या प्रवचणातून
संपूर्ण रामभक्त मंडळीला बोध अमृत पाजला व कार्यक्रम इथेच संपला अशी घोषणा करत सगळ्यांचा आभार मानून कार्यक्रम संपविण्यात आले.