भंडारा येथील आंबेडकर वार्डातील बॅरिकेड्स तात्काळ हटवण्यासाठी दिले जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन जिल्हा परिषदेचे मुन यांना देखील या संदर्भात केली मागणी

भंडारा येथील आंबेडकर वार्डातील बॅरिकेड्स तात्काळ हटवण्यासाठी दिले जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन

जिल्हा परिषदेचे मुन यांना देखील या संदर्भात केली मागणी

भंडारा येथील आंबेडकर वार्डातील बॅरिकेड्स तात्काळ हटवण्यासाठी दिले जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन जिल्हा परिषदेचे मुन यांना देखील या संदर्भात केली मागणी
✍ भवन लिल्हारे ✍
भंडारा उपजिल्हा प्रतिनिधी
मीडिया वार्ता न्युज
8308726855,8799840838

भंडारा :- भंडारा जिल्ह्यातील ग्राम गणेशपूर येथील आंबेडकर वार्डातील रस्तावर लावण्यात आलेले बॅरिकेड्स तात्काळ हलविण्यात यावे अशी मागणी दिनांक ८ एप्रिल २०२२ रोज शुक्रवारला जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन काँग्रेसचे पवन मस्के यांनी निवेदन देऊन केली आहे. भंडारा शहरापासुन जवळच असलेला ग्राम गणेशपुर येथील आंबेडकर वार्ड मध्ये रस्ता दुरुस्तीचे काम नुकतेच पार पडले असून हे बांधकाम पुर्ण झाल्या नंतर काही नागरीकांनी या रस्तावर बॅरिकेड्स लावण्याची मागणी केली. मात्र हे बॅरिकेड्स लागल्याने वार्डातील नागरिकांना येन्या जाण्याकरीता त्रास सहन करावा लागतो आहे. गेल्या २० ते २५ वर्षापासुन स्थानिक नागरिकांना हा रोड येण्या जाण्याकरीता उपयुक्त होता. मात्र आता बॅरिकेड्स लागल्याने नागरिकांना येथुन प्रवास करतांना चांगलाच त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांची समस्या लक्षात घेता जनसेवक पवन मस्के यांनी हे बॅरिकेड्स गेट्स तात्काळ हटविण्यात यावे अशी मागणी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन जिल्हाधिकारी साहेबांना दिली आहे.
या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करीत असतांना त्यांना हि बॅरिकेड्स तात्काळ हटवावे अशी मागणी केली आहे. तसेच जिल्हा परिषदेचे मुन यांना देखील या संदर्भात त्यांनी मागणी केली आहे. रेल्वे विभागाला बॅरिगेड्स हटवून नागरिकांना येने जाने करीता रस्ता खुला करावा जेनेकरून नागरिकांना त्रास होणार नाही याची दखल घेऊन रस्ता मोकळा करावा अशी विनंती निवेदन देण्यात आले आहे. व रहदारीचा रस्ता खुला करण्यात यावा अशी मागणी देखील केली आहे. निवेदन देतेवेळी जनसेवक पवन मस्के, यांच्यासोबत अशोक खोब्रागडे, संजू मते, चेतन जोध, चकोले, सारवे, कल्याण रामटेके कुंडलीक वंजारी, श्रीमती ठाकरे, श्रीमती सरस्वता मते, व गणेशपूर येथील बरेचशे नागरीक उपस्थित होते.