प्रशिक्षण केंद्रातील ६९ पोलिस जवानांना विषबाधा
नामदेव धनगर
मीडिया वार्ता न्यूज
धुळे जिल्हा प्रतिनिधी
मोबाईल नंबर ९६२३७५४५४९
धुळे : – सविस्तर वृत्त धुळे जिल्ह्यातील पोलीस प्रशिक्षण केंद्रात पोलीस प्रशिक्षणार्थ्यांना जेवणात ६९जवानांना विषबाधा झाली रात्रीचे जेवण केल्यानंतर सुरुवातीला २९ पोलीस प्रशिक्षणार्थ्यांना उलटी , संडास व मळमळ या पद्धतीने लक्षण दिसू लागले व त्यांना धुळे येथील हिरे मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आले त्याच नंतर परत त्याच पद्धतीने ४० प्रशिक्षणार्थ्यांना त्याच स्वरूपाचे लक्षण दिसून आल्यामुळे त्यांनादेखील हिरे मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यातून काही जणांना प्राथमिक उपचार करून आपल्या प्रशिक्षण केंद्रात रात्रीच रवाना करण्यात आले तर काही २९ जणांना मात्र दक्षता विभागात त्यांच्यावर उपचार करण्यात आले ही विष बाधा रात्रीच्या जेवणात झाली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे या २९ जवानाची तब्येतीची परिस्थिती चिंताजनक नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे या प्रशिक्षणार्थ्यांना विषबाधा कशामुळे झाली त्याबाबत चौकशीसाठी धुळे शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार पाटील यांच्यामार्फत समिती नेमून ही विषबाधा कशात झाली त्या बद्दल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहे