कोर्धा येथे व्यायामशाळेचे उद्घाटन संपन्न माजी जि.प.सदस्य संजय गजपुरे यांच्या हस्ते शुभारंभ

कोर्धा येथे व्यायामशाळेचे उद्घाटन संपन्न

माजी जि.प.सदस्य संजय गजपुरे यांच्या हस्ते शुभारंभ

कोर्धा येथे व्यायामशाळेचे उद्घाटन संपन्न माजी जि.प.सदस्य संजय गजपुरे यांच्या हस्ते शुभारंभ

अरुण रामुजी भोले
नागभिड तालुका प्रतिनिधी
9403321731

नागभिड — तालुक्यातील कोर्धा येथे ग्रामपंचायत कोर्धा व युवा संघटना , कोर्धा यांच्या वतीने व्यायामशाळेचे उद्घाटन रामनवमीच्या शुभमुहुर्तावर संपन्न झाले. या कार्यक्रमाप्रसंगी उद्घाटक म्हणून माजी जि. प. सदस्य व भाजपा जिल्हा संघटन महामंत्री संजय गजपुरे यांची उपस्थिती होती तसेच कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कोर्धा येथील सरपंच्याओ सौ. पुष्पाताई चौधरी या होत्या.
सदर व्यायामशाळा ही गावातील तरुण युवकांची वारंवार मागणी होत असल्यामुळे ग्रामपंचायत कोर्धा तर्फे १५ व्या वित्त आयोगाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली आहे . यांत अत्याधुनिक साहित्यांची खरेदी करण्यात आली असुन प्रशस्त जागेत असल्यामुळे तरुणांना याचा निश्चितच फायदा होणार आहे . या प्रसंगी कोर्धा चे उपसरपंच दिनेश चौधरी, ग्रामसेवक नाकतोडे साहेब, ग्रा. पं. सदस्य राहुल रामटेके,ग्रा. पं. सदस्या सौ. रेखाताई चौधरी, ग्रा. पं. सदस्या सौ. पुष्पाताई रा. चौधरी, गुरुदेव सहकारी राईस मिल चे अध्यक्ष बंडुभाऊ खेवले , सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष अरुण गायधने , ज्येष्ठ नागरीक वासुदेव जिवतोडे, विजय खोब्रागडे, शंकर मशाखेत्री तसेच इतर गावातील प्रतिष्ठित नागरिक , युवक वर्ग व बालगोपालांची उपस्थिती होती. व्यायामशाळेच्या उद्घाटनामुळे गावातील युवकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here