म्हसळा येथे श्री स्वामी समर्थ महाराज प्रकटदिन साजरा.
✍️संतोष उध्दरकर. ✍️
म्हसळा तालुका प्रतिनिधी
📞७८७५८७१७७१📞
म्हसळा:म्हसळा शहरात श्री स्वामी मठात श्री स्वामी समर्थ महाराज प्रकटदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने सकाळी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मुर्तीवर अभिषेक घालून पुजा करण्यात आली त्यानंतर काकड आरती करुन सामुहिक श्री स्वामी समर्थ जप करण्यात आले, तसेच दुपारी महाप्रसाद व तसेच संध्याकाळी आरती व रात्री शिव पठन असे भरघोस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शहरातील तसेच तालुक्यातील अनेक भाविकांनी श्री स्वामी समर्थ महाराज यांचे दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला, या वेळी येणाऱ्या भाविकांना प्रसादा बरोबर श्री स्वामी समर्थ नित्यपाठ पुस्तिका देण्यात आले.या कार्यक्रमाचे आयोजन श्री स्वामी समर्थ सेवक मंडळ, म्हसळा यांनी केले व मंडळाच्या सर्व सदस्यांनी सेवेचा लाभ घेतला.