कुणबी एकता मांचाचा अनावरण सोहळा मोठया उत्साहात साजरा.
सोहळ्याकरिता कुणबी समाजातील मान्यवरांची उपस्थिती
✒️किरण शिंदे ✒️
लोणेरे विभाग प्रतिनिधी
📞8237609655📞
लोणेरे – माणगाव तालुक्यातील लोणेरे गोरेगाव विभागातील होतकरू सुशिक्षित तरुण एकत्र येऊन गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर कुणबी एकता मंच या समाजिक संघटनेची स्थापना केली. कार्यक्रमाची सुरवात समाज नेते रविंद्र मटकर याच्या शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मान्यवरांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले, नंतर उणेगाव शाळेच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र गीत सादर करुन कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली.
यावेळी समाज नेते रविंद्र मटकर, अरूणजी चाळके, राम टेंबे, महादेव बक्कम, नगराध्यक्ष ज्ञानदेवजी पोवार, अध्यक्ष प्रकाश टेंबे, नथुराम करकरे तात्या, उद्योजक सिताराम उभारे, माजी सभापती महेंद्र तेटगुरे, विलास पाटील, विलास म्हसकर, मधुकर नाडकर, पंढरी शेडगे, वामन बैकर, संतोष भात्रे, ज्ञानेश्वर खराडे तसेच विभागातील सर्व सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य,पोलीस पाटील समाजातील जेष्ठ श्रेष्ठ नागरिक पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी समाज नेत्यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
नंतर कुणबी एकता मंचाचे निलेश केसरकर यांनी प्रस्ताविक केले, ते पुढे म्हणाले की कुणबी समाज गवतासारखा पसरलेला माझा कुणबी समाज संपूर्ण माणगांव तालुक्यात खूप मोठया संख्येने आहे. सर्वच क्षेत्रात समाजाची प्रगती असून समाजाची धुरा सांभाळणारी ज्येष्ठ मंडळी मनापासून समाजाची सेवा स्वतःची पदर मोड करून करीत आहेत. त्यांना सर्वांनी साथ दिली तर त्यांचे हे समाजकार्य नक्कीच समाजाला चांगल्या स्तरावर घेऊन जाईल. हाच विचार घेऊन कुणबी समाजातील आम्ही काही बांधवांनी जेष्ठ मंडळींच्या मार्गदर्शनाखाली समाजकार्यात हातभार लावण्या करीता सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, कला, क्रीडा आणि आरोग्य या क्षेत्रात समाजसेवा करण्यासाठी या एकता मंचाची स्थांपना केली आहे.
प्रत्येक माणसाच्या शिरावर मातृऋण, पितृऋण समाजऋण असतात. या समाज ऋणातून थोडेफार उतराई होण्यासाठी आणि सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी निस्वार्थ भावनेने ज्येष्ठ मंडळींच्या मार्गदर्शनाखाली गुढीपाडव्याचा शुभमुहूर्त साधून जगत् गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या कुणबी समाजात एकतेची गुढी उभारून समाजाला नवी दिशा देण्याचा हा छोटे खानी प्रयत्न असल्याचे त्यांनी म्हटले. प्रत्येक गाव एकता मंचाशी कसा जोडला जाईल तळागाळातील प्रत्येक समाज बांधवांचा विचार करून न्याय देण्याचा निश्चित प्रयत्न केला जाईल.सामाजिक क्षेत्रात कार्य करत असताना अनिष्ट चालीरीतींबाबत प्रबोधन, शेतकरी मार्गदर्शन शिबिर, अंधश्रद्धा निर्मूलन, अन्यायाविरुद्ध लढा,रोजगार निर्मिती, व्यवसाय मार्गदर्शन शिबिर आणि महत्त्वाचे म्हणजे आपले आरक्षण अबाधित ठेवण्यासाठीचा संघर्ष, कुणबी संस्कृतीचे जतन करणे, कलाकारांना प्रोत्साहन देणे,कला जोपासण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे,समाज जागृतीसाठी लोककलेचा वापर करणे यासारख्या गोष्टींकडे लक्ष दिले जाणार असून शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन शिबिर,विविध शासकीय दाखले काढण्यासाठी ई-सेवा केंद्रांची मदत,विविध शिष्यवृत्ती योजना, सेवाभावी संस्थांची मदत, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग, माझे शिक्षण माझ्या समाजासाठी असे उपक्रम राबवले जातील. क्रीडा क्षेत्रात समाजातील खेळाडूंना विविध खेळांसाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाईल,त्याचबरोबर ज्या खेळांच्या माध्यमातून मुलांचे करियर घडेल अशा खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी मार्गदर्शन वर्ग आणि स्पर्धा भरवल्या जातील.आरोग्य क्षेत्रामध्ये आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, विविध लाभाच्या योजना, मुंबईमधील कुणबी बांधवांच्या धरतीवर गाव पातळीवर समाजातील बांधवांसाठी वेळप्रसंगी आरोग्य सुविधा पुरवण्याचा कसोशीने प्रयत्न केला जाईल. एकता मंचामध्ये कोणत्याही प्रकारचे राजकारण असणार नाही आणि केले जाणार नाही. एकता मंचाचा एकच ध्यास कुणबी समाजाचा विकास.जेष्ठ मंडळींच्या मार्गदर्शनाखाली आणि मुंबईमधील कुणबी सेवा चॅरिटेबल ट्रस्ट व कुणबी युवा मंच मुंबई यांच्याशी सलोखा ठेवून एकता मंचाची भविष्यातील वाटचाल सुरू राहिल अशी शेवटी ग्वाही एकता मंचाच्या सभासदांनी यावेळी दिली.
यावेळी चंद्रकांत चेरफळे, वकिल प्रदीप शिंदे, सुधाकर करकरे, रमेश मोरे, निलेश केसरकर, मनीष खाडे ,प्रवीण म्हसकर, राम भोस्तेकर, मंगेश शिंदे, मोहन शेडगे, चंद्रकांत भोजने, विनेश डवले, प्रसाद मांजरे, मुकेश भोस्तेकर, सुजित भोजने, परेश अंधेरे, राजेंद्र गाडे, अमित दांडेकर, अविनाश उतेकर, महेश तळवटकर, सचिन खिडबिडे, सचिन सत्वे, निलेश टेंबे, प्रमोद करकरे, किरण शिंदे, शिवतेज ढऊल, प्रवीण टेंबे, यांनी कार्यक्रम उत्तम रित्या पार पाडण्यासाठी मेहनत घेतली.
कार्यक्रमास लोणेरे गोरेगाव विभागातील बहुसंख्य समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुकेश भोस्तेकर यांनी केले,शेवटी प्रदिप शिंदे वकिल यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.