चारही मार्गावरील अतिक्रमण हटाव मोहीम
✍️ लुकेश कुकडकर ✍️
गडचिरोली तालुका प्रतिनिधी
मो 8999904994
गडचिरोली : शहरातील चारही मुख्य मार्गावर दुकानांचे अतिक्रमण वाढले आहे. त्यामुळे वाहतुकीस अडचण होत होती. दरम्यान, वाढत्या अतिक्रमणांनी नागरिकांना त्रास होत होता. दरम्यान, याची दखल घेत स्थानिक पालिका प्रशासनाने धानोरा मार्ग, चामोर्शी मार्ग, कॉम्प्लेक्स भागात अतिक्रमण हटाव मोहीम राबविली. न्यायालयापासून जिल्हा तर एमआयडीसीपर्यतचा रस्ता मोकळा केला.
कोटगल मार्गावर जिल्हा न्यायालय, गोंडवाना विद्यापीठ, उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासह विविध शासकीय कार्यालये आहेत. त्यामुळे या भागात नागरिकांची मोठी वर्दळ असते. सायंकाळी गांधी चौक परिसरात मोहीम बुधवारला सकाळच्या सुमारास प्रशासनाने कॉम्प्लेक्स भागात अतिक्रमण हटाव मोहीम राबविली. त्यानंतर सायंकाळी ४ वाजतापासून उशिरापर्यंत येथील इंदिरा गांधी चौक परिसरातील फुटपाथ दुकानांचे अतिक्रमण जेसीबीद्वारे काढले.
आणखी तीन दिवस ही मोहीम चालणार असून, गांधी चौक संपूर्ण परिसर, चामोर्शी, आरमोरी, धानोरा व चंद्रपूर रोड पूर्णतः मोकळा करण्यात येणार आहे. सदर कारवाई मुख्याधिकारी सूर्यकांत २ पिदुरकर, उपमुख्याधिकारी जयवंत काटकर, नगररचनाकार गिरीश मैंद, निखिल दोडके, स्थापत्य अभियंता अंकुश भालेराव, शहर अधिक्षक मोरेश्वर पेंदाम, करनिरीक्षक स्वप्नील घोसे यांनी केली.