गडमौशी येथे सातवी शिक्षण परिषद संपन्न

गडमौशी येथे सातवी शिक्षण परिषद संपन्न
जितेंद्र नागदेवते
सिंदेवाही तालुका प्रतिनिधी
8806689909 
सिंदेवाही :- सिंदेवाही पं स सिंदेवाही अंतर्गत येत असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गडमौशी येथे नुकतीच सातवी शिक्षण परिषद संपन्न झाली या कार्यक्रमाचे आयोजन सुनील ऊईके केंद्र प्रमुख सिंदेवाही यांच्या अंतर्गत घेण्यात आली त्यामध्ये केंद्रातील 17 शाळांच्या 28 शिक्षकांना सहभाग नोंदविला.
7 एप्रिल 2025 रोजी सिंदेवाही केंद्रांतर्गत सर्व जिल्हा परिषद, खाजगी अनुदानित शाळांतील शिक्षकांची शिक्षण परिषद आयोजित करण्यात आलेली होती त्यामध्ये पहिला टप्प्याचे उदघाटक अध्यक्ष म्हणून अध्यक्ष सोनालीताई पेंदाम, सरपंच, गडमौशी तसेच उद्घाटकआत्मज मोरे, .गटविकास अधिकारी पं स. सिंदेवाही , कार्यक्रमाचे उपाध्यक्ष नितीन तोडासे अध्यक्ष शा. व्य. स तर प्रमुख अतिथी
किशोर पिसे गटशिक्षणाधिकारी पं.स.सिंदेवाही, छोटूभाई आवळे विस्तार अधिकारी (शिक्षण) पं. स. सिंदेवाही . मनिषाताई मंडलवार, पो. पा. गडमौशी
मनोज वासेकर, उपाध्यक्ष, शा. व्य. स, सत्कारमूर्ती मा.दिलीप शंकर मडावी, सेवानिवृत्त शिक्षक जि प. प्राथ शाळा इंदिरानगर. संघपाल डांगे, सेवानिवृत्त शिक्षक उपस्थित होते.
यावेळी जि.प.प्राथमिक शाळा आंबोलीचे
नवोदय विद्यालय पात्र विद्यार्थी श्रुतिका दिनकर सरपते कच्चेपार, मार्गदर्शक शिक्षक हरिदास शेडमाके सर जि.प.उ. प्राथमिक शाळा कच्चेपार
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा प्रथम क्रमांक (खाजगी)
संगिता यादव, मॅडम सर्वोदय कन्या विद्यालय सिंदेवाही मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा जि.प. तृतीय क्रमांक
जयंत देवाजी लेंझे मुख्याध्यापक व सविता बारस्कर मॅडम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जाटलापूर तुकूम उपस्थित होते किशोर पिसे गटशिक्षणाधिकारी पं.स.सिंदेवाही यांनी सत्कार प्रसंगी व नवोदय पात्र विद्यार्थी यांचा सन्मान सोहळा याविषयी सविस्तर असे प्रेरणादायी मार्गदर्शन केले तर सुनील ऊईके केंद्रप्रमुख केंद्र सिंदेवाही प्रास्ताविकेतून कार्यक्रमाची व शिक्षण परिषदेची रूपरेखा विषद केली.
सविता तेजराम बारस्कर स. शि. जाटलापूर तुकूम यानी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमाची माहिती, निपूण वर्ग करण्यासाठी केलेले उपक्रम व प्रयत्न याविषयी माहिती सांगितली. संगिता यादव मुख्याध्यापीका सर्वोदय कन्या विद्यालय सिंदेवाही यांनी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमा अंतर्गत खाजगी विभागात प्रथम क्रमांक पटकाविला त्याबद्दल त्यांनी केलेले प्रयत्न आपल्या मनोगतात व्यक्त केले. दिलीप मडावी सेवा निवृत्त शिक्षक व संघपाल डांगे सेवानिवृत्त शिक्षक यांनी आपल्या सेवाकार्यांचे व सर्व शिक्षकांनी सहकार्य केल्याबद्दल आभार व्यक्त केले. सोनालीताई पेंदाम सरपंच गडमौशी यांनी गावातील विद्यार्थ्यांनी गावाचे नाव जिल्ह्यात उज्वल करण्यासाठी शिक्षकांची मेहनत फळाला आली याबद्दल मंदा नंदनवार मॅडम यांचे कौतुक केले. यावेळी
विशेष उपस्थीत म्हणून
रेवन मोहुर्ले विषय साधन व्यक्ती गटसाधन केंद्र सिंदेवाही,प्रविण मेश्राम विषय साधन व्यक्ती गटसाधन केंद्र सिंदेवाही, लक्ष्मीकांत गहाणे तज्ञ गटसाधन केन्द्र सिंदेवाही भिमानंद मेश्राम विषय तज्ञ गटसाधन केंद्र सिंदेवाही,सुधीर बगडे सर विशेष शिक्षक समूह साधन केंद्र गडबोरी, मोहाळी,याची विशेष उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे दुसरा टप्प्यात सुनिल ऊईके केंद्रप्रमुख प्रमुख केंद्र सिंदेवाही यांनी निपुण भारत,100 दिवस क्रुती कार्यक्रम आराखडा ,याविषयी मार्गदर्शन केले. रेवन मोहुर्ले, विषय तज्ञ सिंदेवाही यांनी PAT परीक्षा याबाबत मार्गदर्शन केले
कार्यक्रमाचे संचालन सचीन मेश्राम मुख्याध्यापक लोनवाही यांनी केले आभार प्रदर्शन हरिदास शेडमाके स. शि. कच्चेपार यांनी आभार मानले.
जि. प. उच्च प्राथमिक शाळा गडमौशी शाळेच्यावतीने चहा व नाश्ता तथा केंद्राच्या वतीने स्वादिष्ट भोजनाची उत्तम सोय करण्यात आली.विशेष आभार मंदा नंदनवार मुख्याध्यापिका गडमौशी यांनी एक शिक्षकी शाळा असूनही शाळेने उत्तम नियोजन व व्यवस्था केली त्याबद्दल मनापासून आभार मानले. केंद्रातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका यांनी खूप खूप सहकार्य लाभले .