मिरजेत ऍड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवस “स्वाभिमान दिन” म्हणून साजरा.

✒प्रशांत कदम मिरज प्रतिनिधी✒
मिरज,दि.10 मे:- वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त जिवन आवश्यक वस्तुचे वाटप करून स्वाभिमान दिन साजरा करण्यात आला. यावेळी मिरज येथील आस्था बेघर महिला निवारा केंद्र या ठिकाणी राहणाऱ्या महिलांना जीवनावश्यक वस्तू देण्यात आले तसेच सध्या लॉकडाऊन मध्ये कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी, महानगरपालिकेचे सफाई कर्मचारी, हॉस्पिटलमध्ये कार्यरत असणारे कर्मचारी यांना अल्पोपहार व लस्सी वाटप करण्यात आले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे सांगली जिल्हा कार्याध्यक्ष महावीर (तात्या) कांबळे, सांगली जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत (दादा) खरात, मिलिंद कांबळे, मनोहर कांबळे, प्रशांत (दादा) कदम, सागर आठवले, दीक्षांत सावंत, निशांत भंडारे, सिद्धार्थ लोंढे, शरद वाघमारे, निखिल कोलप, ऋषीकेश माने आदी उपस्थित होते.