काँग्रेस आमदाराने दिली वर्धा जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याला पोलिसांसमोर मारण्याची धमकी.

✒प्रशांत जगताप, प्रतिनिधी✒
वर्धा,दि.10 मे:- वर्धा जिल्हातुन एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेत एकच खळबळ उडाली आहे. देवळी-पुलगाव विधानसभा क्षेत्रात आमदाराला कुठलीही विचारणा न करता थेट कोविड चाचणी शिबीर आयोजित करण्यात आल्याचा ठपका ठेवत काँग्रेसचे आमदार रणजित कांबळे यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले यांना अश्लिल शिवीगाळ करून थेट पोलिसांसमोरच मारण्याची धमकी मोबाईल फोन वर दिली. कोरोना महामारीच्या काळात डॉक्टर आणि आरोग्य यंत्रणा जीवाच रान करत आहे. आणि जबाबदार जनप्रतिनिधी कड़ुन अशा प्रकार निंदनिय असून दोषी आमदारावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी, अन्यथा कामबंद आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी गट अ संघटनेच्यावतीने देण्यात आला आहे.
जिल्हात मोठ्या प्रमाणात कोरोना वायरसचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेनेवर मोठ्या प्रमाणात तान येत आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक कोरोना वायरस बाधित रुग्णांला चांगली आरोग्य सेवा देण्याबरोबर कोरोना वायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करीत आहेत. नवीन कोरोना बाधित रुग्णांची वेळीच कोविड ट्रेस करून त्यांना चांगली आरोग्य सेवा देण्याच्या उद्देशाने देवळी तालुक्यातील एका गावात कोविड चाचणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. त्या क्षेत्रातील आमदाराला विचारणा न करता कोविड19 टेस्ट शिबिर आयोजित करण्यात आल्यामुळे पुलगाव-देवळी विधानसभा क्षेत्राचे काँग्रेसचे आमदार रणजित कांबळे यांनी डीएचओ डॉ. अजय डवले यांच्याशी त्यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधून त्यांना अश्लिल शिवीगाळ करून थेट बड्या पोलीस अधिकाऱ्यांसमोर मारण्याची धमकी दिली.
आ. रणजित कांबळे याचा हा व्यवहार कोरोना वायरसच्या महामारीचा काळात 24 तास आरोग्य सेवा देणाऱ्या अधिकाऱ्यांचे मानसिक खच्चीकरण करणारा असून तो निंदनिय आहे. यामुळे आ. कांबळे यांच्याविरुद्ध कलम 294, 353, 506, 332, 333, 188, 504, 65 (ब.) तसेच आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा भंग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी. मंगळवारी सकाळी 9 वाजेपर्यंत दोषी आमदाराविरुद्ध कारवाई न झाल्यास कामबंद आंदोलनाचा इशारा जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांना दिलेल्या निवदेनातून देण्यात आला आहे. निवेदन देताना महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी गट अ संघटनेचे पदाधिकारी तसेच सदस्य उपस्थित होते.