प्रवेश परिक्षांच्या तयारीसाठी भारतीय जनता पार्टीचा अभिनव उपक्रम

55

प्रवेश परिक्षांच्या तयारीसाठी भारतीय जनता पार्टीचा अभिनव उपक्रम

मीडिया वार्ता न्यूज

१० मे, मुंबई: अकरावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र सीईटी (MH-CET), नीट (NEET) आणि जेईई (JEE) सारख्या प्रवेश परिक्षांमध्ये अपेक्षित यश मिळावे त्यासाठी त्यांचा योग्य प्रकारे सराव व्हावा या उद्देशाने भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश सचिव श्रीमती दिव्या ढोले ह्यांनी विद्यार्थ्यांच्या सोयी करीता “फ्री ऑफ कॉस्ट” मोफत ” “ऑनलाइन मॉक टेस्ट पेपर सिरीयस सेट” पर्याय उपलब्ध करून दिला आहे. या ‘ऑनलाईन मॉक टेस्ट पेपर सिरीयस सेट’ संकेतस्थळाचे शनिवारी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.  

महाविद्यालयीन परिक्षा संपल्यांनंतर या प्रवेस परिक्षांचा अभ्यास व सराव करण्यासाटी मुलांना योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता असते. अधिकाधिक प्रश्नपत्रिका दिलेल्या वेळेत सोडविण्याचा सराव व्हावा यासाठी “फ्री ऑफ कॉस्ट” मोफत ” “ऑनलाइन मॉक टेस्ट पेपर सिरीयस सेट” पर्याय उपलब्ध करून दिला. 

त्यासाठी सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी www.divyadholay.com ह्या पोर्टल वर नाव नोंदवायचं आहे. (रेजिस्ट्रेशन मोफत आहे ह्याची कृपया नोंद घ्यावी). नाव नोंदणी केल्यावर विद्यार्थ्यांनी त्यांची परिक्षा निवडावी. प्रत्येक परिक्षेची ३० प्रश्नांची प्रश्नपत्रिका उपलब्ध आहे. ह्या सामाजिक शैक्षणिक उपक्रमाचा आपल्या विद्यार्थ्यांनी आवर्जून लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी प्रदेश सचिव श्रीमती दिव्या ढोले यांनी केले.