पुरस्कार प्रदान सोहळ्यात रंगले खुले कविसंमेलन, तेजस्विनी बहुउद्देशिय संस्था मारडातर्फे आयोजन
अश्विन गोडबोले
चंद्रपूर महानगर प्रतिनिधी
मो: 8830857351
चंद्रपूर,8 मे: तेजस्विनी बहुउद्देशिय संस्था मारडा तर्फे दरवर्षी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. या ही वर्षी राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार प्रदान सोहळा, निमंत्रितांचे कविसंमेलन व खुले कवीसंमेलनाचे आयोजन रविवार ७ मे रोजी श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय, चंद्रपूर येथे करण्यात आले. या कार्यक्रमात पहिल्या सत्रात राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार सोहळा, दुसऱ्या सत्रात निमंत्रितांचे कवी संमेलन, तिसऱ्या सत्रात कार्यक्रमाचा शेवट खुले कवी संमेलनाने करण्यात आला. खुल्या कविसंमेलनाचे अध्यक्ष म्हणून सुनिल बावणे तर प्रमुख पाहुणे म्हणून गजानन माद्यसवार, किरण चौधरी उपस्थित होते.
यावेळी खेमराज भोयर,विवेक पत्तीवार,प्रदीप देशमुख,बी.सी नगराळे, महेश कोलावार, रमेश भोयर, सरीता बांबोळे, अनुराग गोवर्धन, वसंत ताकधट, उज्वला नगराळे, आरती रोडे, दिक्षा थुल, मंदाकिनी चरडे, सुचिका बुक्कावार,अमित कुससंगे, नानाजी रामटेके, शालिक दानव, प्रशांत उज्वलकर, विजय भगत, मंगला कारेकर,रजनी हस्ते, आनंदी ठेंगरे, राज संदेकर, सांजवी उज्वलकर, ललित बोरकर, अनघा मेश्राम, नागसेन सहारे आदी कवींनी आपल्या कविता सादर करुन प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.
या सत्राचे संचलन युवा कवी स्वप्नील मेश्राम यांनी केले तर आभार संस्थेच्या संस्थापिका संगीता धोटे यांनी मानले.