आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्व यंत्रणांचा समन्वय आवश्यक—-जिल्हाधिकारी किशन जावळे
✍️नितेश पुरारकर ✍️
नांदवी पुरार प्रतिनिधी
📞7021158460
माणगांव :- रायगड जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता
मान्सून काळात येणाऱ्या पाऊस, पूर, वीज तसेच अन्य आपत्तींचे व्यवस्थापन करण्यासाठी सर्व यंत्रणांचा समन्वय आवश्यक आहे. आपत्ती काळात तात्काळ संपर्क करून आपण अल्पावधित कार्यवाही करू शकतो.त्यासाठी सर्व यंत्रणांनी दक्ष व सज्ज रहावे,असे निर्देश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय मान्सून पूर्व तयारी आढावा बैठक 2024चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी ते बोलत होते.व्यासपीठावर पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड, अप्पर जिल्हाधिकारी सुनील थोरवे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी यासह एन डी आर एफ, एसडीआरएफ, होमगार्ड ,महावितरण , सार्वजनिक बांधकाम, प्रादेशिक परिवहन अधिकारी, राष्ट्रीय महामार्ग, रेल्वे यासह विविध शासकीय विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री जावळे म्हणाले, सर्व शासकीय यंत्रणा नी अतिधोकादायक व धोक्याची संभावना असलेल्या ठिकाणांची पाहणी करावी.या ठिकाणच्या नागरिकांना मान्सून कालावधीमध्ये सुरक्षित जागी स्थलांतरीत करता यावे यासाठी निवाऱ्याची सज्जता करावी. तसेच या काळात उपविभागीय अधिकारी व पोलीस अधिकारी, तहसीलदार यांनी उत्तम समन्वय राखत काम करावे. नगरपालिका महानगरपालिकांनी नालेसफाईची कामे 25 मे पूर्वी पूर्ण करावीत. तसेच महाड शहरात दरवर्षी पूर परिस्थिती निर्माण होते. अशा पूरपरिस्थितीत मदत कार्य व बचावासाठी आवश्यक पूर्वतयारी व उपाययोजना केली जावी. आपत्तीच्या प्रसंगी रेल्वे, राष्ट्रीय महामार्ग आदी विभागांनी देखील नागरिकांच्या मदत व सुरक्षेच्या दृष्टीने पूर्वतयारी करावी.
सार्वजनिक बांधकाम विभागाने धोकादायक पूलांची तपासणी करून आवश्यक दुरुस्ती तात्काळ करावी व पर्यायी मार्ग सुस्थितीत ठेवावेत. तसेच रस्त्यावरील खडे, साईडपट्टी भरुन घेणे, रस्त्यावरील ब्लिंकर्स, बोर्ड, डायव्हर्शनचे बोर्ड, बॉल्क स्पॉटवर रिफ्लेक्टर्स बसवावेत. सर्व विभागांकडील शोध व बचाव साहित्यांची दुरुस्ती करून सर्व साहित्य सुस्थितीत राहील, याची दक्षता घ्यावी. आवश्यक शोध व बचाव पथक, रुग्णवाहिका, स्थलांतराचे ठिकाण, अन्न पाण्याची व्यवस्था, जेसीबी मशिन्स, वूड कटर्स, बोट, लाईफ जॅकेट, स्पीड बोट, जनरेटरसह इ. साहित्य व मनुष्यबळ सर्व विभागांनी सज्ज ठेवावेत.
पूर परिस्थितीमुळे रोगराई पसरुन साथरोगाचा धोका असतो. अशा ठिकाणी फवारणी करावी. पुरेसा औषधांचा साठा ठेवावा असे जिल्हाधिकारी श्री जावळे यांनी सुचित केले.
जिल्हा पोलीस अधीक्षक श्री घार्गे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बास्तेवाड
दुर्घटना व वैद्यकीय मदत तातडीने होण्याच्या दृष्टीने जिल्हा शल्यचिकित्सकांशी समन्वय राखून आरोग्य विभागास काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. कोणत्याही आपत्कालीन प्रसंगास तत्पर व सक्षमपणे सामोरे जाण्याचे व अतिवृष्टी होत असल्यास नदीकडेच्या पूरग्रस्त भागातील व दरडग्रस्त गावांमधील नागरिकांचे तात्काळ सुरक्षित ठिकाणी स्थलांतर होण्यासाठी मान्सूनपूर्वी पाहणी करून पूर्वतयारी करण्यात येत आहे.पूरपरिस्थती निर्माण होणार नाही. अतिवृष्टी व पाणीपातळीची माहिती नदी किनाऱ्यावरील नागरिक, स्थानिक प्रशासन, पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासनास पोहोचविण्याबाबत संबंधितांनी सतर्क रहावे. असे यावेळी सांगण्यात आले.
निवासी उपजिल्हाधिकारी श्री शिर्के यांनी तालुकास्तरीय नियंत्रण कक्ष 24×7 कार्यान्वित बाबत, तसेच विविध विभागांचे परिपूर्ण आपत्ती व्यवस्थापन आराखडे जिल्हा प्रशासनास पाठवण्याबाबत सांगितले. पुनर्वसन सुरू असलेल्या गावांतील कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण होण्याबाबत सांगीतले.
विविध विभागांच्या वतीने यावेळी आगामी मान्सून पूर्व तयारी बाबत सुरू असलेल्या कामांबद्दल माहिती देण्यात आली .याचबरोबर अतिवृष्टीमध्ये नागरिकांनी धबधब्याच्या ठिकाणी, गडकिल्ले धोकादायक ठिकाणी जावू नये. तसेच रायगड पाटबंधारे विभागाने धरणांची तातडीने तांत्रिक तपासणी करून आवश्यक दुरुस्ती करावी, अतिवृष्टी विचारात घेवून टप्प्या-टप्याने धरणांतून विसर्ग करावा. मागील वर्षी घडलेल्या इर्षाळगड वाडी येथील दुर्घटना, यासह विविध माहिती यावेळी देण्यात आली. बैठकीचे प्रास्ताविक प्रास्ताविक जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक यांनी केले. जिल्हा प्रशासनाकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहनही जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.