नेरळ- पत्नीचा गळा चिरून पलायन; अवघ्या पाच तासात आरोपी पोलिसांच्या ताब्यात

नेरळ- पत्नीचा गळा चिरून पलायन; अवघ्या पाच तासात आरोपी पोलिसांच्या ताब्यात

नेरळ- पत्नीचा गळा चिरून पलायन; अवघ्या पाच तासात आरोपी पोलिसांच्या ताब्यात

नेरळ- पत्नीचा गळा चिरून पलायन; अवघ्या पाच तासात आरोपी पोलिसांच्या ताब्यात

संदेश साळुंके
कर्जत रायगड प्रतिनिधी
९०१११९९३३३

नेरळ :- नेरळ पोलीस ठाणे हदीतिल उमा नगर येथे राहणारी दिव्या मोहन खुजूर हिचे लग्न होऊन पती अजय कृष्णा भिंडलान इंदरगड चिंडीचांदी पानिपत हरियाणा येथे नांदत असे त्यांच्यात कौटूबीक वाद निर्माण झाले म्हणून दिव्या सासरहून कंटाळून नेरळ येथे राहण्यास आली.

अजयने दिव्याचे नेरळ येथील घर गाठले. दिव्याची आई झोपल्याचे पाहून मला तुझे सोबत काही महत्वाचे बोलायचे आहे म्हणून तू माझ्यासोबत बाहेर चल असे सांगून तिला मौजे उमा नगर येथील स्मशानभूमी जवळील जंगलमय भागात नेले. पती अजय यांनी दिव्याला माझ्या सोबत माझ्या गावी नांदायला चल असे सांगितले. त्यास दिव्याने नकार दिला म्हणून अजय याने त्याच्या जवळील स्याग मधून मोठी सुरी काढून दिव्याच्या गळ्यावर, डाव्या हातावर, डाव्या खांद्यावर वार करून तिला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला पण दिव्या हिने कसाबसा तेथून पळ काढला. रक्त बंबाळ होऊन आपले घर गाठले. तिच्या आईने विलंब न लावता नेरळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्र गाठले.

नेरळ पोलिसांना हि खबर दिल्याने नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे, पोलीस उप निरीक्षक प्राची पांगी, पो.उ.नि. सरगर, स.पो.नि. श्रीरंग किसवे यांनी घटना स्थळावर भेट दिली. जखमी दिव्या हिच्या सांगण्यावरून घटना ठिकाणी पाहणी केली असता आरोपीने तेथून पलायन केले होते मात्र दिव्यावर वार केलेली मोठी सुरी मिळाली म्हणून त्यांच्या पंचनामा करण्यात आला.

फरारी आरोपी याचा शोध घेण्याकरिता S.D.P.O. डी.डी. टेळे यांच्या सूचना प्रमाणे A.P.I. शिवाजी ढवळे यांनी P.S.I. सरगर, स.पो.नि. श्रीरंग किसवे पो.शि.१८३६ राजाभाऊ केकान, पो.शि. १४१५ विनोद वांगळेकर यांचे पथक तयार करण्यात आले.

गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीला अवघ्या पाच तासात मुंबई-जोगेश्वरी येथून मुसक्या आवळ्यामुळे जखमीच्या कुटुंबातील लोकांनी समाधान व्यक्त केले आहे. गुन्हा क्रमाक १०७/२०२४ भा. द. वी. कलम ३०७ प्रमाणे नोंद असून पुढील तपास पो. स. ई. नितीन मंडलिक करीत आहेत. जखमी पिढीत पुढील उपचार उल्हासनगर येथील शासकीय रुग्णालयात होत असून तिची प्रकृती स्थिर आहे असे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. अशा प्रकारच्या घटना वारंवार होत आहेत तर ह्याचा अंदाज झपाट्याने नागरिकरण वाढल्याने घडत आहे असे बोलले जात आहे. याआधीही नेरळ-खोपोली परिसरात अश्या घडलेल्या होत्या. अशा प्रसंगाच्या वेळी आजूबाजूच्या लोकांनी सतर्क रहावे असे आवाहन नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांनी जनतेला आवाहन केले आहे. चार तासात तपासाचा निष्पन्न केल्यामुळे सर्व स्थरावरून पोलिसांचे कौतुक केले जात आहे.