उत्कृष्ट महिला मंचातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

उत्कृष्ट महिला मंचातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351

चंद्रपूर : ७ मे
उत्कृष्ट महिला मंच नेहमीच समाजोपयोगी आणि सेवाभावी कार्य करत असते. याच भूमिकेतून, संस्थेने नुकतेच शहरातील दोन गुणवंत विद्यार्थ्यांचा त्यांच्या उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरीबद्दल सन्मान केला. हा कार्यक्रम ६ मे २०२५ रोजी आयोजित करण्यात आला होता.

उत्कृष्ट महिला मंचच्या अध्यक्षा, माजी नगरसेविका छबूताई वैरागडे यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थी गौरव येरणे याने कार्मल अकॅडमी आयसीएसइ बोर्डात ९४.८० टक्के गुण मिळवले आणि एफईएस गर्ल्स ज्युनिअर कॉलेजची विद्यार्थिनी निर्जल येरणे हीने वाणिज्य विभागात ९३.३३ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी छबूताई वैरागडे यांनी दोन्ही विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्यांनी सांगितले की, या विद्यार्थ्यांनी केवळ आपल्या कुटुंबाचेच नव्हे, तर जिल्ह्याचे नाव रोशन केले आहे. हार न मानता सतत प्रयत्न करत राहण्याची त्यांची जिद्द इतरांसाठी प्रेरणादायी आहे, असेही त्या म्हणाल्या.

या सन्मान सोहळ्याप्रसंगी उत्कृष्ट महिला मंचच्या अनेक सदस्या उपस्थित होत्या. मालती कूचनवार, माया खनके, अर्चना येरणे, वैशाली कन्नमवार, सोनू गुंडे, शितल तगलपलीवार, योगिता धनेवार, शालिनी राऊत, भारती ठाकरे, सुषमा बेले, विद्या चित्रीव, मनीषा भाके आणि वैशाली येरणे यांनी या गुणवंत विद्यार्थ्यांना शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले.

या कार्यक्रमातून उत्कृष्ट महिला मंचाने पुन्हा एकदा दाखवून दिले की, ते केवळ महिलांसाठीच नव्हे, तर समाजातील प्रत्येक घटकाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी नेहमीच तत्पर असतात. गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करून, त्यांनी भावी पिढीलाही उत्तम काम करण्याची प्रेरणा दिली आहे.