स्टेशन ठाकूरवाडी येथे ट्रॉलीबॅग मध्ये सापडलेल्या महिलेचा मृतदेहच्या गुन्ह्याची उकल!
कर्जत नेरळ पोलीस ठाण्याच्या पोलीसांनी सदर गुन्ह्यातील आरोपी इसम व महिला यांच्या बेंगलोर येथून मुसक्या आवळल्या !
अप्पर पोलीस अधीक्षक शिवतारे यांची पत्रकार परिषद
✍🏻 दिनेश सुतार ✍🏻
कर्जत, प्रतिनिधी
मो.9764605917
कर्जत :- दि. १६ एप्रिल २०२५ रोजी दुपारचे १२.३० वाजण्याचे सुमारास कर्जत पोलीस ठाणे हद्दीतील स्टेशन ठाकूरवाडी गाव हद्दीतील मुंबई – पुणे जाणाऱ्या डाऊन रेल्वे रुळाचे शेजारी एक ट्रॉलीबॅग मध्ये एका महिलेचा मृतदेह अढळ्याची घटना घडल्याचे समोर आली होती. सदर घटने विषयी पुणे लोहमार्ग महिला पोलीस हवालदार छाया दिलीप चव्हाण यांनी तक्रार दिल्या प्रमाणे कर्जत पोलीस ठाण्यात सदर अज्ञात मृत महिलेच्या खुना विषयी अज्ञात मारेकऱ्या विरोधात खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला होता.
सदर मृत महिलेचे वय अंदाजे २८ ते ३२ वर्ष असून, तीचे नाव व पत्ता निष्पण झालेला नसुन, अंगाने मजबूत, रंग गृहवर्णीय, केस काळे व लांब, उंची ५ फुट, मृत महिलेचे हात व पाय हिरव्या रंगाचे नायलॉन दोरीने बांधलेले, अंगात लाल रंगाचा गोल गल्याचा टी-शर्ट तसेच पायात पाढऱ्या रंगाची व त्यावर पुलाची नक्षीकाम असलेली पॅन्ट, व मृत महिलेचा चेहरा व डोके काळ्या रंगाच्या प्लास्टिक पिशवीमध्ये बांधल्याचे, गळया भोवती हिरव्या रंगाच्या नायलॉन दोरीने आवळलेले, तसेच कपाळपट्टीवर एका पाढऱ्या रंगाचे कपड्याने बांधल्याचे व डोळे व जीभ बाहेर अर्धवट आलेल्या स्थितित पिंक रंगाचे ट्रॉलीबॅग मध्ये अढळून आली होती. मात्र महिलेच्या मृतदेहा जवळ कोणताही ओळख पठविण्याकरीता असा ठोस पुरावा नसल्याने व सदर महिलेचा खून करून पुरावा नष्ट करण्याचे हेतूने मृतदेह हा पिंक रंगाचे ट्रॉलीबॅग भरून ट्रेनमधून टाकल्याचा अंदाज घेत. रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवतारे व कर्जत उप विभागीय पोलीस अधिकारी डी.डी टेळे यांनी अनोळखी महिलेच्या खूनाचा छडा व तिच्या अज्ञात मारेकऱ्याचा शोध घेण्यासाठी त्यांचे प्रमुख मार्गदर्शनाखाली कर्जत पोलीस ठाणे व नेरळ पोलीस ठाणे येथील वेगवेगळे तपास पथक तयार करण्यात आले होते.
मात्र सदर माहिलेचा मृतदेह हा पुणे मार्गाकडे जाणाऱ्या रेल्वे रूला शेजारी सापडल्याने या दोन्ही पोलीस ठाण्यातील तपास पथकांनी मध्य रेल्वेच्या प्रमुक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर ठाणे कल्याण, पनवेल, लोकमान्य टिळक टर्मिनस व कर्जत रेल्वे स्थानकावरील एकूण २०० ते २५० सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता, लोकमान्य टिळक टर्मिनस या रेल्वे स्थानकच येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये मृतदेह सापडलेल्या वर्णनाप्रमाणे पिंक रंगाची ट्रॉली बॅग बळाचा वापर करून घेऊन जाणारा एक संशईत इसम दिसून आल्याने, लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकातील फ्लॅटफार्म क्रमांक ४ वरील वेगवेगळे कॅमेरे वेगवेगळ्या अँगलने तपासले असता, सदर संशईत इसम व महिला दि.१५ एप्रिल २०२५ रोजी रात्री २२.१७ वाजता मुंबई कोइंबतुर एक्सप्रेस नंबर ११०१३ या ट्रेनमधील कोच क्रमांक १०१४९६ ने बोगी क्रं. ए-१ एसी कोच मध्ये बसुन गेल्याचे निष्पण झाल्या प्रमाणे रेल्वे प्रशासनाचे रिझर्वेशन विभाग मुंबई यांच्या कडून त्या बोगीमधून प्रवास करणाऱ्या एकूण ५२ प्रवाशांची माहिती व रिझर्वेशन करीता दिलेला मोबाईल नंबर प्राप्त करत त्यांचे सिडीआर प्राप्त केले असता, सदर दोन्ही संशईत इसमांनी बुक केल्याचे व ते बेंगलोर येथे उतरल्याचे सीडीआर वरून प्राप्त झाल्याने, बेंगलोर रेल्वे स्थानकातील दि. १६ एप्रिल २०२५ रोजीचे सदर ट्रेनचे रात्रीचे २०.५६ वाजताचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, संशयित इसम व महिला यांच्याकडे पिंक रंगाची ट्रॉली बॅग ही दीसून न आल्यामुळे व अधिकचा संशय बळावल्याने दोन्ही तपास पथकाने मोबाईलचा तांत्रिक पुराव्यांचा आधार घेत अत्यंत कौशल्याने सदर संशयीत महिला व पुरुष यांचे वास्तव्याचे पुरावे प्राप्त करून, दि. १६ मे २०२५ रोजी दोघांच्या बेंगलोर येथून मुसक्या आवळल्या आहेत. धनलक्ष्मी एराप्पा रेड्डी ऊर्फ बिंदू वय ३४ वर्ष, रा. रापताडू, आंध्रप्रदेश असे मृत तरुणीचे नाव असून, पोलीसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपी व्हि. विजयकुमार व्यंकटेश वय २६ वर्ष, रा. चित्तूर, आंध्रप्रदेश आणि टी यशस्विनी राजा वय २४ वर्ष, रा. तिरुपती, आंध्रप्रदेश अशी नावे असुन, त्यांना न्यायालयता हजर केले असता, दोन्ही आरोपीना सात दिवसाची पोलीस कस्टडी देण्यात आली आहे. सदर महिलेच्या खूनाची उकल करण्याकामी कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड, नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी ढवळे यांच्यासह नेरळ पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक संदीप फड, पो.शि केकाण, पो.शि बेद्रे, पो.शि वांगणेकर, पो. शि वाघमारे, पो.शि दवणे, कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक कीर्तीकुमार गायकवाड, पोहवा येरुंकर, पोहवा भोईर, पोलीस उपनिरीक्षक किरण नवले, पो. शि कारकूड यांनी अहोरात्र कष्ट घेवून या गुन्ह्यांची उकल केली आहे. या दोन्ही तपास पथकास रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे व अप्पर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवतारे यांच्या स्तरावरून उत्तम कामगिरी बद्दल विस हजार रूपयांचे बक्षिस जाहीर करण्यात आले आहे. तर सदर गुन्ह्यांचा आधीक तपास हा कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड हे करीत आहेत. असेj कर्जत पोलीस ठाणे येथे अप्पर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवतारे यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली आहे.