जळगाव जिल्हात 10 हजारांची लाच घेतल्या प्रकरणी, पोलीस उपनिरीक्षक व हवालदार अटक.
पोलीस विभागात मोठ्या प्रमाणात भष्ट्राचार, रक्षक जेव्हा बनतात भष्ट्र कोन आयकणार गरिबाची तक्रार.

✒️जळगाव जिल्हा प्रतिनिधी✒️
जळगाव,दि10 जुन:- जळगाव जिल्हातील वरणगाव येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. वाळूची वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई न करण्याच्या मोबदल्यात 10 हजार रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी वरणगाव येथील पोलीस उपनिरीक्षक आणि लाच घेणारा हवालदार अशा दोघांना अटक करण्यात आली आहे त्यामुळे पोलीस विभागात एकच खळबळ उडाली आहे. गुरुवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास पोलीस स्टेशनमध्ये ही कारवाई करण्यात आली.
पोलीस उपनिरीक्षक सुनिल जगन्नाथ वाणी वय 56 वर्ष, रा.भिरूड कॉलनी,भुसावळ आणि पोकॉ. गणेश महादेव शेळके वय 31 वर्ष, रा.पोलीस वसाहत,वरणगाव अशी अटक करण्यात आलेल्या भष्ट्राचारी पोलीसांची नावे आहेत.
प्राप्त माहितीनुसार, तक्रारदार यांच्या मालकीच्या डंपरद्वारे माघिल अनेक दिवसा पासून वाळूची वाहतूक केली जाते. या वाहनावर कारवाई न करण्यासाठी पीएसआय वाणी याने दहा हजार रुपयांची लाच मागितली होती. यानंतर लाचेची ही रक्कम पोकॉ. गणेश शेळके याने घेतली. त्याने रक्कम घेताच पोलीस ठाण्याच्या आवारात असलेल्या लाच लुचपतप्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात दोघांना अटक केली.