पाचोरा येथे राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापनदिन उत्साहात साजरा.

51

पाचोरा येथे राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापनदिन उत्साहात साजरा.

पाचोरा येथे राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापनदिन उत्साहात साजरा.
पाचोरा येथे राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापनदिन उत्साहात साजरा.

ईसा तडावी, पाचोरा तालुका प्रतिनिधी✒
पाचोरा/ जळगाव,दि.10 जुन:- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 22 व्यावर्धापन दिन मोठ्या उत्साहवर्धक वातावरण साजरा करण्यात आला. वर्धापनदिनानिमित्त पाचोरा येथील पक्ष कार्यालयात ध्वजारोहण करून हुतात्मा स्मारक येथे पाचोरा शहर व तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने कोविड योद्धानचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमा प्रसंगी सिव्हील हॉस्पिटलचे डॉक्टर, वॉर्ड बॉय, नर्सेस, सोबत ऑक्सिजन पुरवठादार, रुग्णवाहिका चालक, सर्व बिटचे कर्मचारी, आशा स्वयंसेविका, यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी आमदार दिलीपभाऊ वाघ सोबत गटनेते नानासो संजय वाघ सर्व आजी माजी नगरसेवक, सर्व फ्रंटलचे आजी माजी पदाधिकारी, सर्व संस्थांचे चेअरमन, माजी चेअरमन, सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.