कोकणवासीयांनो सावधान…बिपरजॉय येतोय

✍️सचिन पवार 

रायगड ब्युरो चीफ

📞8080092301

रायगड,:- प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांच्याकडून मिळालेल्या पूर्व सूचनेच्या अनुषंगाने अरबी समुद्रात “बिपर जॉय” नावाचे चक्रीवादळ तयार झालेले असून या वादळामुळे दि. 9 ते 12 जून या कालावधीत समुद्र खवळलेला राहणार आहे. तरी दि 9 ते 12 जून या कालावधीत मच्छिमारांनी समुद्रात मासेमारीसाठी जावू नये. तसेच जे मच्छिमार मासेमारीसाठी समुद्रात गेलेले असतील त्यांनी किनारी परत यावे. या कालावधीत समुद्र खवळलेला राहणार असून तसेच समुद्र किनारी वेगाने वारे वाहणार असल्याने नागरिकांनी तसेच पर्यटकांनी समुद्र किनारी (बिचेसवर) जाणे टाळावे, प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार रायगड जिल्ह्यात पर्जन्यमान विषयक व वाऱ्याच्या वेगाविषयक खालीलप्रमाणे सूचना देण्यात आलेल्या आहेत.

 या कालावधीत जिल्ह्यातील पर्जन्यमान स्थिती पुढीलप्रमाणे : – दि.9 जून रोजी जिल्हयातील काही ठिकाणी वादळी वारा ( वाऱ्याचा वेग 30-40 कि.मी. प्रति तास) व विजांच्या गडगडाटासह पर्जन्यमान होण्याची शक्यता आहे. दि.10 जून रोजी जिल्ह्यातील काही ठिकाणी वादळी वारा ( वाऱ्याचा वेग 30-40 कि.मी. प्रति तास) ढगांच्या गडगडाटासह पर्जन्यमान होण्याची शक्यता आहे. दि.11 जून रोजी जिल्हयातील काही ठिकाणी मध्यम स्वरुपाचे पर्जन्यमान होण्याची शक्यता आहे. तर दि.12 जून रोजी जिल्ह्यातील काही ठिकाणी हलक्या स्वरुपाचे पर्जन्यमान होण्याची शक्यता आहे.

https://mediavartanews.com/2023/06/05/domestic-violence-and-men/

  बिपरजॉय चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टीवर दि. 9 जून रोजी कर्नाटक-गोवा महाराष्ट्र किनाऱ्याजवळ समुद्र खवळलेला राहणार आहे. काही ठिकाणी किमान 40 ते कमाल 60 किमी प्रति तास वेगाने वाहण्याची शक्यता आहे. दि.10 जून रोजी अरबी समुद्र आणि गोवा-महाराष्ट्र किनाऱ्याजवळ आणि बाहेर 35-45 किमी प्रति तास वेगाने तर कमाल 55 किमी वारे वाहण्याची शक्यता आहे. दि.11 जून रोजी अरबी समुद्र आणि गोवा महाराष्ट्र किनाऱ्याजवळ आणि बाहेर 35-45 किमी प्रति तास वेगाने तर दि.12 जून रोजी कर्नाटक-गोवा महाराष्ट्र किनाऱ्याजवळ समुद्र खवळलेला राहणार आहे. आणि समुद्राजवळून 40-50 किमी तर कमाल 55 ते 60 किमी प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.  

  तरी या कालावधीत समुद्र खवळलेला राहणार असल्याने नागरिकांनी समुद्रात जावू नये, पोहण्यासाठी समुद्रात उतरू नये, समुद्राच्या ठिकाणी सेल्फी काढू नये.कोणत्याही प्रकारच्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदतीसाठी नागरिकांनी खालील क्रमांकावर संपर्क साधावा :-

1. जिल्हा नियंत्रण कक्ष-02141-222097 

2. जिल्हा पोलीस नियंत्रण कक्ष-02141-228473 टोल फ्री नं.112

3. प्रादेशिक बंदर विभाग नियंत्रण कक्ष-02141-222746

तर जिल्ह्यातील ठिकाणी तालुका नियंत्रण कक्ष कार्यरत असून ते पुढीलप्रमाणे : 

1.अलिबाग- 02141-222054, तहसिलदार श्री.विक्रम पाटील, मो.क्र.8879343401

2. पेण-02143-252036, तहसिलदार, श्रीमती स्वप्नाली डोईफोडे, मो.क्र.9921873159

3. मुरुड- 02144-274026, तहसिलदार, श्री.रोहन शिंदे, मो.क्र.8087243789

4. पनवेल-022-27452399, तहसिलदार, श्री.विजय तळेकर, मो.क्र.9420919992 

5. उरण-022-27222352, तहसिलदार, श्री.उध्दव कदम, मो.क्र.8108504037

6. कर्जत- 02148-222037, तहसिलदार, श्री.शितळ रसाळ, मो.क्र.8087513083

7. खालापूर-02192-275048, तहसिलदार,श्री.आयुब तांबोली, मो.क्र.9975751076

8. माणगाव- 02140-262632, तहसिलदार, श्री.विकास गारुडकर, मो.क्र. 9049929914

9.तळा- 02140-269317/7066069317, तहसिलदार,श्रीमती स्वाती पाटील, मो.क्र.9653448578

10.रोहा-02194-233222, तहसिलदार,डॉ.किशोर देशमुख, मो.क्र.9960248999

11.पाली-02142-242665, तहसिलदार,श्री.उत्तम कुंभार, मो.क्र.9422840625/9975655375

12.महाड-02145-222142, तहसिलदार,श्री.सुरेश काशिद, मो.क्र.9921332695/8180932485

13.पोलादपूर-02191-240026, तहसिलदार,श्री.समीर देसाई, मो.क्र.9673163479

14.म्हसळा-02149-232224, तहसिलदार,श्री.समीर घारे, मो.क्र.9503707370

15.श्रीवर्धन-02147-222226, तहसिलदार,श्री.महेंद्र वाकलकर, मो.क्र.7038754822

16.अधीक्षक माथेरान-02148-230294, श्री.दिक्षात देशपांडे, मो.क्र.8669056492

        जिल्ह्यात आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी नियंत्रण कक्षाशी संपर्क करावा , कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये व अफवा पसरवू नये, कोणत्याही मिळालेल्या बातमीची खात्री अधिकृत सूत्राकडून करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण,रायगड डॉ. योगेश म्हसे यांनी जिल्ह्यातील नागरिकांना केले आहे.

https://mediavartanews.com/2023/06/04/ashok-saraf-movies-and-interesting-facts/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here