बजाज चंद्रपूर तंत्रनिकेतनच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न
🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351
चंद्रपूर : 10 जून
सीबीएससी व महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अंतर्गत इयत्ता १० वी १२ वी चा निकाल नुकताच जाहीर झाला असून यात प्राविण्य प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा बजाज चंद्रपूर तंत्रनिकेतन च्या वतीने रविवार, ९ जून रोजी बजाज चंद्रपूर तंत्रनिकेतन येथे सकाळी १०.३० वाजता गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या सुरवातीला सर्वोदय महिला मंडळाच्या अध्यक्ष निल सी. बजाज यांच्या हस्ते माता सरस्वती आणि संस्थेच्या संस्थापिका तथा संस्थेच्या प्रेरणास्त्रोत यशोधरा देवी बजाज यांच्या प्रतिमेचे पुजन व दिपप्रज्वलन करण्यात आले. या कार्यक्रमात सर्वोदय महिला मंडळाच्या अध्यक्ष निल सी. बजाज, संस्थेच्या सचिव ममता बजाज, संस्थेचे मुख्य कार्यपालन अधिकारी भरत बजाज, बजाज चंद्रपूर तंत्रनिकेतन चे प्राचार्य यांच्या हस्ते सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
या सत्कार सोहळ्याला शहरातील विविध माध्यमाच्या एकूण ५४ शाळेमधून १४८ विद्यार्थी तसेच शाळेचे मुख्याधापक, वर्ग शिक्षक आणि प्रत्येक शाळेतून तीन गुणवंत विद्यार्थी व त्यांचे पालक उपस्थित होते. उपस्थित सर्व मुख्याध्यापक तथा वर्ग शिक्षक, पालक व सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक, भेट वस्तू देऊन त्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कॉलेजच्या सर्व विभागाचे विभाग प्रमुख, सर्व प्राध्यापक वृंद व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यानी भाग घेतला.