वाघ्रण येथे जेष्ठ नागरीक संघाची भारत – पाक युद्धातील शहिदाना श्रद्धांजली रॅली संपन्न

वाघ्रण येथे जेष्ठ नागरीक संघाची भारत – पाक युद्धातील शहिदाना श्रद्धांजली रॅली संपन्न

रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३

अलिबाग:- जेष्ठ नागरीक संघ वाघ्रणच्या वतीने ८ जूनला भारत – पाक युद्धातील शहिदाना श्रद्धांजलीपर रॅली संपन्न झाली .
छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाला सरपंच राजेंद्र पाटील यांनी पुष्पहार अर्पण केला . तर जेष्ठ नागरीक संघ अध्यक्ष विनायक म्हात्रे यांनी श्रीफळ वाढवीला .
या वेळी जेष्ठ नागरीक संघ वाघ्रण – खारपेढांबे संघाचे संस्थापक सल्लागार दिपक पाटील यांनी प्रास्ताविक करताना असंख्य जेष्ठाना रॅलीचे उद्देश युद्धातील घडामोडी व भारतीय सैन्याची कामगीरी या बद्दल मार्गदर्शन केले . तर अनंत धोदरे यांनी मनोगत व्यक्त केले .
स्मारकाजवळ शहीद सैनिकाना सामुहीक श्रद्धांजली अर्पण करून रॅलीला सुरुवात झाली . या वेळी प्रत्येक पुरुष आणि महिलेच्या हातात तिरंगा फडकत होता . वाघ्रण गावातून रॅली खारपेढांबे गावातून फिरताना भारत माता कि जय , जय जवान जय किसान, शहीद भारत जवान अमर रहे, पाकिस्तान मुर्दाबाद घोषणांनी गावांना आवाज दुमदुमत होता . रॅली पुन्हा स्मारकाजवळ आली तेव्हा रविकीरण पाटील जेष्ठ नागरीक यांचे मनोगत झाले .
तर यावेळी बारावीत गावात प्रथम आलेल्या कुमारी हर्षा कृष्णा धोदरे या मुलीचा सत्कार करण्यात आला. या वेळी संघ संस्थापक हेमंत मधुसुदन पाटील यांनी उपस्थित पदाधिकारी आणि जेष्ठांचे आभार मानले . रॅली मध्ये वाय . बी पाटील,सचिव गणेश पाटील ग्रा.पं. सदस्य हरिश्चंद्र पाटील, जेष्ठ सदस्य बळवंत गावंड मोहन धोदरे, हरीश्चंद्र भोईर, एच एन पाटील दयानंद म्हात्रे, राम भोईर, रामभाऊ पाटील, शंकर पाटील ,शिरीष पाटील अशोक पाटील, भरत भोईर, ललीता पाटील प्रगती पाटील, हेमा पाटील, मनिषा म्हात्रे, संध्या धोदरे,मंजूषा धोदरे, अभिलाषा पाटील, अनिता पाटील, चंद्रभागा पाटील, माजी उपसरपंच मनिषा पाटील, आशा पाटील, उषा पाटील, शर्मिला पाटील, सुवर्णा पाटील, हरेश्वर पाटील, प्रमोद पाटील, नितीन पाटील, राजेंद्र पाटील इत्यादी अबाल वृद्धांसह असंख्य जण सामील झाले . रॅली उत्स्फुत संपन्न झाली .