सोनार बंगला पी. के. रोड स्कूल 1994 बॅचचा स्तुत्य उपक्रम — संगोपिता दिव्यांग विकास केंद्राला दिली प्रेरणादायी भेट

64

सोनार बंगला पी. के. रोड स्कूल 1994 बॅचचा स्तुत्य उपक्रम — संगोपिता दिव्यांग विकास केंद्राला दिली प्रेरणादायी भेट

बदलापूर, ८ जून २०२५ — सोनार बंगला, पी. के. रोड स्कूल, मुलुंड(पश्चिम) येथील दहावी १९९४ बॅचचे सुमारे २० माजी विद्यार्थी सामाजिक बांधिलकी जपत बदलापूर येथील संगोपिता दिव्यांग विकास कौशल्य केंद्र येथे भेट देऊन तेथील दिव्यांग मुलांना शालेय साहित्याचे वाटप केले.

ही भेट स्वाती मोरे-उतेकर व संदीप गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आली होती. संगोपिता ही संस्था विशेषतः बौद्धिक दिव्यांग मुलांचे संगोपन, शिक्षण व कौशल्यविकास यासाठी कार्यरत आहे. संस्थेमध्ये मुलांकडून सुशोभित पणत्या तयार करणे, मशीनवर विणकाम करणे यासारखी कामे करून घेतली जातात. त्यांची मानसिक आणि शारीरिक परिस्थिती पाहून उपस्थित सर्वांचे मन हेलावले. विशेषतः स्वाती उतेकर आणि शीला गडांकुश यांचे अश्रू अनावर झाले.

या उपक्रमात विशेष उल्लेखनीय म्हणजे रेश्मा गावडे, ज्या स्वतः व्हीलचेअरवर असूनही अपार जिद्दीने आणि आत्मबलाने सहभागी झाल्या. त्या आणि त्यांची संपूर्ण फॅमिली ट्रेनने प्रवास करून कार्यक्रमात हजर राहिली. पुण्याहून राम थोरात यांनी लांबचा प्रवास करून सहभाग नोंदवला. भास्कर ठोंबरे व फॅमिली आणि *न्यू प्रगती शैक्षणिक संस्थेचे* सह सचिव महेश गडांकुश व त्याची फॅमिली यांचा सहभाग मोठा व प्रेरणादायी ठरला.

कार्यक्रमाचे आयोजन व समन्वय सुधीर पाटकर यांनी केले. हरीश धनावडे यांनी सर्वांसाठी खाऊची पॅकेट्स पुरवली. वाढदिवसानिमित्त स्वाती मोरे-उतेकर यांनी आपल्या ओळखीतील व्यक्तींना सहभागी करून घेत निधी गोळा केला. बॅचमधील इतर सदस्यांनीही सहर्ष योगदान दिले.

या सामाजिक उपक्रमात पुढील माजी विद्यार्थी विशेषतः उत्साहाने सहभागी झाले:

अजित कदम,दिगंबर शिगवण,शिवाजी आव्हाड, मंदा कदम,उदय जाधव,निलेश भोळे,विनोद सकपाळ,सतीश बनसोडे,अतुल मांजरेकर, तानाजी टेमगिरे सर्वांच्या एकत्रित सहभागातून हा कार्यक्रम अत्यंत प्रेरणादायी व यशस्वी ठरला. भविष्यातही अशा उपक्रमांची मालिका सुरू ठेवण्याचा निर्धार या भेटीतून सर्वांनी व्यक्त केला.