गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वरा:!

गुरु: साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः!!

श्री. दिगंबर माने

उमरखेड, १० जुलै:

नियमित व वक्तशीरपणे शाळेत उपस्थित राहणे.

 गुरुजी हा विद्यार्थ्यांच्या जीवनातील एक महत्त्वाची व्यक्ती आहे. जी आपल्या ज्ञानाने संयमाने प्रेमाने आणि काळजीने त्याच्या संपूर्ण आयुष्याला मजबूत आकार देते. भारतात प्राचीन काळापासून गुरुशिष्य परंपरा असून गुरुजी हे आम्हाला जगण्याचा योग्य मार्ग दाखवतात. योग्य दिशेकडे वाटचाल करण्यासाठी प्रेरित करतात त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवनातील सर्वात अग्रगण्यस्थान म्हणजे गुरुजी होय. गुरुजीवर सर्व समाजाचा विश्वास आहे. सर्व स्तरातील समाज हा चांगल्या नजरेने गुरुजीकडे बघतो त्यामुळे गुरुजीने शाळा,विद्यालय, कॉलेज मध्ये नियमित जाणे येणे अध्यापन करणे, स्वच्छपेहराव, आनंदी चेहरा विद्यार्थ्यासोबत योग्य दिशेने हितगुज करणे. विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी सोडवणे जस्या जमेल त्या पद्धतीने मदत करणे. या साऱ्या बाबीवर स्वयंप्रेरणेने लक्ष देणे महत्त्वाचे आहे. हे सारे पालन म्हणजेच वक्तशीरपणाची ओळख होय.

निर्धारित अभ्यासक्रम निर्धारित कालावधीत पूर्ण करणे

शाळा सुरू होताच आपण प्रत्येक विषयवार, वर्गनिहाय तासिकेचे, आपण वाटप तथा नियोजन करतो. त्यानुसार प्रत्येक गुरुजीची जबाबदारी वाढते. त्यामुळे उद्याला कोणत्या तासिका आहेत कोणत्या विषयाचे अध्यापन करायचे आपले प्रत्येकाचे नियोजन असते. त्यामुळे पूर्व तयारी म्हणून उद्याला जो घटक शिकवायचा आहे. त्यामध्ये दैनिक टाचण,मासिक, वार्षिक नियोजन केलेले असते. जेणेकरून आपली तासिका विद्यार्थ्यासोबत प्रभावी अध्यापन झाले पाहिजे. कारण विद्यार्थी म्हणजे गुरुजीचा खरा आरसा असतो. माझी तासिका कशी झाली हे विद्यार्थ्यांना न विचारता विद्यार्थ्यांनी म्हटले पाहिजे गुरुजी आजची तासिका खूप छान झाली. उद्याला कोणता पाठ,कविता प्रकरण घटक घेणार असे उद्गार विद्यार्थ्यांनी काढले पाहिजे व त्याच वेळेस गुरुजीचे समाधान होणार भीतीपोटी विद्यार्थ्यांचे उद्गार महत्त्वाचे नाहीत तर विद्यार्थ्याला गुरुजींची आदर युक्त भीती असावी. व गुरुजींनी सुद्धा विद्यार्थ्याला आई वडील तथा पालकाचे प्रेम दिले पाहिजे. आदराने वागविले पाहिजे. त्यासाठी इतर खाजगी कामे न करता शिक्षकाने शाळा एक शाळा ३६५ दिवस शाळा हे जर ध्येय ठेवले तरच आपण विद्यार्थ्यांशी शाळेशी आपली खरी मैत्री श्रद्धा म्हणावी लागेल. हे सर्व कार्य अखंड नियमित केले तर नक्कीच आपण आपला अभ्यासक्रम निर्धारित वेळेत पूर्ण करू व खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांना न्याय देऊ. व उद्याचा भारत सक्षम करू.

विविध प्रशिक्षणात सहभागी होणे

जे गुरुजन युवातरुण आहेत त्यांनी शाळा विद्यार्थी समाज ह्या गोष्टी समजून ऊमजून घ्यायच्या आहेत.त्यामुळे आपण सारे 21 व्या शतकात पदार्पण केले.आजच्या आधुनिक भारतात संगणकाचा टी.व्ही. भ्रमणध्वनी, टॅब. ,गणित पेटी, विज्ञान पेटी, नकाशे स्वनिर्मित शैक्षणिक साहित्य, स्वंयम अध्ययन कार्ड, विविध चार्टस, मॉडेल्स या साहित्याचा अध्यापनात उपयोग घ्यावा लागणार ही सर्व साहित्य तुम्हाला हाताळता आले पाहिजे. विद्यार्थ्यांना समजावून सांगता आले पाहिजे. त्यासाठी शासनाने जे प्रशिक्षण आयोजित किंवा कार्यशाळा घेतलेल्या आहेत त्या प्रत्येक प्रशिक्षणात तुमची आमची उपस्थिती असणे महत्त्वाचे आहे. त्याशिवाय काही गोष्टी नवीन माहिती नीट समजणार नाही व पर्यायाने विद्यार्थ्यांना आपण न्याय देण्यास कमी पडू त्यामुळे शासनाच्या प्रत्येक आदेशाचे आपण आदराने पालन करणे हे आपले कर्तव्य आहे.

शालेय दैनंदिन उपक्रमात विद्यार्थ्यांना सहभागी करणे

जी कौशल्य,कला शिक्षकात आहेत ती कला कौशल्य विद्यार्थ्यांना आत्मसात झाली पाहिजे व विद्यार्थी पर्यायाने प्रत्येक कलेत परिपक्व होणार त्यासाठी प्रत्येक उपक्रमात विद्यार्थ्याला सहभागी करणे अतिशय महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्याकडे दुर्लक्षित करून चालणार नाही. एखाद्या वेळेस एखादा प्रयोग नाही जमला तरी चालेल त्याला पुन्हा पुन्हा समजावून सांगून तो विद्यार्थ्याकडून करून घेण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे.जसे आपण म्हणतो “चुका आणि शिका”तो विद्यार्थी शिकेपर्यंत आपण त्याच्या चुका दुरुस्त केल्या पाहिजेत त्यासाठी पात्र होईपर्यंत विद्यार्थ्यांचा पाठलाग केला पाहिजे हे महत्त्वाचे आहे आणि कोणतीही गोष्ट आत्मसात करण्यासाठी पहिल्याच प्रयत्नात सर्वांना यश मिळणे अशक्य आहे. ज्याप्रमाणे मराठीत सुविचार आहे. “बनत बनत बन जायेगा”तुम्ही जे कौशल्य विद्यार्थ्यांना सांगितले त्याबद्दल विद्यार्थी तुमचे स्मरण जीवनभर करेल हीच खरी गुरुजीची खरी कमाई आहे. म्हणून विद्यार्थ्यांसाठी भरपूर प्रयत्न करा भरपूर यश मिळेल व ईश्वर तुम्हाला भरपूर आयुष्य देईल.

जे का रंजले गांजले! त्यासी म्हणे जो आपले!! तोचि साधू ओळखावा! देव तेथचि मानावा!!

     आपण सर्वांनी विद्यार्थ्यां प्रती देव जाणावा.

शाळेतील उपलब्ध साधन सामग्रीचा अध्यापनात वापर करणे.

आजच्या काळात खूप काही सुविधा आहेत जुन्या काळात तर पाटील, देशमुख, मारवाडी, जागीरदार यांच्या दारी दरबारी शाळा भरत होत्या. केव्हा केव्हा बिन भिंतीची उघडी शाळा लाखो इथले गुरु अशी निसर्गरम्य परिसरात वातावरणात झाडाखाली शाळा भरत होत्या. त्यामध्ये शाळेची इमारत महत्त्वाची नसून खरी इमारत घडवण्यासाठी गुरुजी महत्त्वाचा असतो व गुरुजी कितीही चांगला असून चालणार नाही तर त्याला शाळेत शाळेचा कणा म्हणजे विद्यार्थी पाहिजेत आज खाजगी शाळेमुळे विद्यार्थ्यांसाठी सारखी ओढाताण होत आहे.त्यासाठी शिक्षकाचे आदर्श राहणीमान, वाचन, लेखन, वेळेवर येणे जाणे या सर्व बाबीवर लक्ष देणे महत्त्वाचे आहे.

स्थानिक शाळा परिसर समाज त्या गावातील लोकांचे सहकार्य या सर्व गोष्टीचा सारासार विचार करून आपण अध्यापनाचे धडे गिरवणे व विद्यार्थ्यांचा विकास कसा साध्य होईल याकडे अतिशय सूक्ष्मपणाने काटेकोरपणे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. व आपल्या हातातून डॉक्टर,इंजिनियर, शिक्षक, कार्यकर्ता, नेता, अधिकारी, कलाकार, खेळाडू असे विद्यार्थी बनावेत ही तर सर्वांची ईच्छा आहे. पण त्याहीपेक्षा माझ्या देशातील प्रत्येक व्यक्ती हा सुजाण नागरिक बनला पाहिजे. आपल्या हातातून चांगला नागरिक तयार व्हावा हीच या मातृभूमीची या काळ्या आईची, विद्येची देवता माता सरस्वतीची अपेक्षा आहे. असे मला तरी वाटते.

 इतर विभागापेक्षा आपल्या शैक्षणिक क्षेत्राकडे प्रत्येक विद्यार्थ्याच्या आई-वडिलांचे, पर्यायाने समाजाचे, अधिकाऱ्याचे, राजकीय लोकांचे, सर्वांचे लक्ष लोक अतिशय सुंदरतेने सूक्ष्मपणाने बघतात त्या बघणाऱ्यांचे स्वप्न फक्त गुरुजीच पूर्ण करू शकतो. व त्यासाठी समाधान मानावे व मोठे मन करून तुम्ही आम्ही उत्कृष्ट विद्यार्थी घडवावे हीच अपेक्षा.. उत्कृष्ट विद्यार्थी हीच उद्याच्या भारताची खरी ताकद आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here