मेट्रो-3 करशेडविरोधात आरेमध्ये पुन्हा एकदा आंदोलन

मेट्रो-3 करशेडविरोधात आरेमध्ये पुन्हा एकदा आंदोलन

मेट्रो-3 करशेडविरोधात आरेमध्ये पुन्हा एकदा आंदोलन

पूनम पाटगावे
जोगेश्वरी मुंबई प्रतिनिधी
मो. नं.- 8149734385

जोगेश्वरी:- राज्य सरकारच्या आरेमध्येच कारशेड करण्याच्या निर्णयविरोधात रविवारी सकाळी 11 ते 12 यावेळेत आरेतील पिकनिक पॉईंट येथे आंदोलन करण्यात आले. मागील रविवारी मेट्रो-3 कारशेडविरोधात झालेल्या आंदोलनानंतर आज पुन्हा एकदा आरेमध्ये निसर्गप्रेमी, आरेतील रहिवासी, विविध सामाजिक संस्था, समिती आणि सामान्य मुंबईकर यांनी एकत्रित येऊन राज्यसरकारच्या निर्णयाविरोधात आवाज उठवला.
आजच्या आरेच्या कारशेडबाबतच्या आंदोलनास मा. श्री. आदित्य ठाकरे यांनीही तेथे उपस्थिती दर्शवून पाठिंबा दर्शविला. नव्या सरकारने कारशेडबाबत घेतलेल्या निर्णयाचा निषेध व्यक्त केला. तसेच विविध राजकीय पक्षांकडूनही या निर्णयाबाबत विरोध दर्शविला जात आहे. विविध राजकीय पक्षांतर्गत मेट्रो-3 कारशेडबाबत आंदोलनही केले गेले.
आरे जंगल वाचवण्यासाठी लढा देत असलेल्या सर्व पर्यावरप्रेमी आणि संस्थांना मराठी एकीकरण समितीनेही जाहीर पाठींबा दर्शविला आणि पुन्हा एकदा आरे बचवाची हाक दिली. तसेच प्रत्येक रविवारी असे आंदोलन करण्यात येईल व या प्रत्येक आंदोलनात मुंबईकरांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे असे आवाहन पर्यावरणप्रेमीनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here