जळगाव जिल्हात सहा वर्षीय चिमुकलीवर 72 वर्षीय वृध्दाकडून अत्याचाराचा प्रयत्न.

जळगाव जिल्हात सहा वर्षीय चिमुकलीवर 72 वर्षीय वृध्दाकडून अत्याचाराचा प्रयत्न.

जळगाव जिल्हात सहा वर्षीय चिमुकलीवर 72 वर्षीय वृध्दाकडून अत्याचाराचा प्रयत्न.
जळगाव जिल्हात सहा वर्षीय चिमुकलीवर 72 वर्षीय वृध्दाकडून अत्याचाराचा प्रयत्न.

*मिडिया वार्ता न्यूज*
   *जळगाव जिल्हा प्रतिनिधी*
    ✒ *विशाल सुरवाडे* ✒

जळगाव/यावल :- जळगाव जिल्हातून एक संतापजनक बातमी समोर आली आहे. यावल तालुक्यातील अंजाळे येथे एका 72 वर्षीय नराधाम वृध्दाने एका सहा वर्षीय चिमूकलीला फूस लावून घरात बोलावले व तिच्या सोबत अश्लीलकृत्य केले व तिच्यावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केला. यात प्रचंड भयभित झालेल्या बालिकेने आरडा-ओरड करीत पळ काढत घर गाठले. 2 ऑगस्ट रोजी घडलेल्या या घटनेचा चाईल्ड हेल्प लाइनच्या माध्यमातून शनिवारी यावल पोलिसात पोस्को सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

72 वर्षीय वृद्धाविरोधात गुन्हा
अंजाळे, ता. यावल येथील माहेर असलेली विवाहिता सहा वर्षीय बालिकेस आली असता सोमवार, 2 ऑगस्ट रोजी विवाहिता तिच्या आई -वडीलांसोबत भुसावळ गेली असताउदुपारी 12 वाजेच्या बालिका घराबाहेर खेळत असता गावातील 72 वर्षीय वृध्द विश्वनाथ हरी तायडे याने या सहा वर्षीय बालिकेला फसू लावुन त्याच्या घरात बोलावले व तिच्याशी अश्लील चाळे केले व काही वेळाने बालिकेवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केला. या प्रकाराने बालिका ही प्रचंड घाबरली व आरडा-ओरड करीत घराबाहेर पळाली. बालिका आजी-आजोबाच्या घरी गेल्याचे पाहून विश्वनाथ तायडे यानेदेखील घरातून पळ काढला. शनिवार, 7 ऑगस्ट रोजी चाईल्ड लाईनचे जिल्हा समन्वयक यांनी पीडीत बालिकेच्या कुटुंबीयांची भेट घेतली व रात्री या प्रकरणी यावल पोलिसात बालिकांचे लैगिंक आत्याचार पासुन सरंक्षण कायदा पोस्कोसह अत्याचाराचा प्रयत्न सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक अजमलखान पठाण, पोलीस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले, हवालदार राहुल चौधरी, निलेश वाघ आदी करीत आहे.