*९ ऑगस्ट क्रांती दिवस हुतात्म्यांना व शहिदांना श्रद्धांजली अर्पण करून केली साजरी
९ ऑगस्ट , अर्थात क्रांती दिन!
ऑगस्ट क्रांती दिन… लढेंगे या मरेंगे

९ ऑगस्ट , अर्थात क्रांती दिन!
ऑगस्ट क्रांती दिन… लढेंगे या मरेंगे
त्रिशा राऊत
चिमूर तालुका प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यूज चंद्रपूर
Mo 9096817953
चंद्रपूर : – इंग्रजांच्या गुलामगिरीतून देशाला मुक्त करण्यासाठी ज्यांनी प्राणांचे बलिदान दिले त्यांना आठवण्याचा दिवस म्हणजे ९ ऑगस्ट , अर्थात क्रांती दिन! लढेंगे या मरेंगे सन १९४२चा अखेरचा लढा देण्याचे महात्मा गांधींनी ठरविले. ८ ऑगस्ट १९४२ रोजी मुंबईच्या गोवालिया टँक मैदानावर (ऑगस्ट क्रांती मैदान) झालेल्या काँग्रेसच्या ऐतिहासिक अधिवेशनात गांधीजींनी ब्रिटिश सत्तेला चले जावचा इशारा दिला. ‘लढेंगे या मरेंगे’ची घोषणा झाली आणि बघता बघता सारा देश पेटून उठला. त्याच रात्री गांधींजींसह सर्व मोठ्या नेत्यांना अटक झाली. हजारो, लाखो तरुणांनी यात भाग घेतला आणि सारा देशच तुरुंग बनला. अनेक कार्यकर्ते भूमिगतही झाले.
पण दुस-या दिवशी ९ ऑगस्टला मुंबईसह अनेक ठिकाणी जनक्षोभ उसळला. स्वातंत्र्य सौदामिनी ब्रिटिशांच्या जुलमाला न जुमानता अरुणा असफअली या तरुणीने अखेर गोवालिया टँकवर तिरंगा फडकावला.स्वातंत्र्याचा मंत्र अधिवेशनात गांधीजींनी दिलेला ‘चले जाव’चा नारा स्वातंत्र्याचा मंत्र ठरला.देशभर पडसाद…मुंबईतून सुरू झालेल्या या आंदोलानाचे पडसाद देशभर उमटू लागले.जुलमाचा कहर निशस्र आंदोलकांवर ब्रिटिशांनी लाठीचार्ज केला, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.
क्रांतीच्या स्मृती हा स्मृतिस्तंभ तेव्हाच्या गोवालिया टँकवर म्हणजेच आताच्या ऑगस्ट क्रांती मैदानावर या लढ्याच्या स्मृती जागवत उभा आहे.अशाप्रकारे ९ ऑगस्ट क्रांती दिवस म्हणून संपूर्ण भारतात साजरा केला जातो. अशाचप्रकारे चिमूर येथील हुतात्मा स्मारक व अभ्यंकर मैदानावर शहिदांना श्रद्धांजली काँग्रेस पक्षातर्फे अर्पण करण्यात आली.
या कार्यक्रमास माजी आमदार डॉ. अविनाश वारजूरकर , संजय घुटके तालुका अध्यक्ष , धनराज मालके ,पिठाडे सर ,विजय डाबरे , राजेश चौधरी , अविनाश अगडे , पप्पू शेख , विनोद राऊत , प्रमोद दाभेकर , गौतम पाटील विधानसभा अध्यक्ष ,अनिल लोणारे ,विलास मोहिणकर , सविता चौधरी महिला तालुका अध्यक्ष, वनिता मगरे , गीतांजली थूटे , नाजेमा पठाण तालुका अल्पसंख्याक अध्यक्ष , दिक्षाताई भगत माजी सरपंच , शैनाज अन्सारी तालुका अल्पसंख्याक उपाध्यक्ष , ममता भीमटे व आदी काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.