ग्राम पंचायत पथदिव्यांचे बिल भरणार नाही,उलट महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीने ग्राम पंचायत ला व्यवसाय कर द्यावे… अरविंद राऊत सरपंच चिचाळा(शास्त्री*

*ग्राम पंचायत पथदिव्यांचे बिल भरणार नाही,उलट महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीने ग्राम पंचायत ला व्यवसाय कर द्यावे… अरविंद राऊत सरपंच चिचाळा(शास्त्री*

ग्राम पंचायत पथदिव्यांचे बिल भरणार नाही,उलट महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीने ग्राम पंचायत ला व्यवसाय कर द्यावे... अरविंद राऊत सरपंच चिचाळा(शास्त्री*
ग्राम पंचायत पथदिव्यांचे बिल भरणार नाही,उलट महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीने ग्राम पंचायत ला व्यवसाय कर द्यावे… अरविंद राऊत सरपंच चिचाळा(शास्त्री*

त्रिशा राऊत
चिमूर तालुका प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यूज चंद्रपूर
Mo 9096817953

चंद्रपूर : -ग्रामीण भागातील अनेक ग्राम पंचायत चे आर्थिक उत्पन्न कमी आहे घर भाडे व पाणी पट्टी च्या माध्यमातून जे कर ग्राम पंचायत ला जमा होते त्यामधून कर्मचारी मानधन,गटारे सफाई व गावातील पथदिवे इत्यादी बाबीसाठी तो पैसा खर्च होतो टॅक्स वसुली पूर्ण असेल तर हे शक्य होते अन्यथा ह्या बाबींना सुध्दा पैसा कधी शिल्लक राहत नाही.त्यामध्ये ग्राम पंचायत कार्यालयाचे विद्युत बिल व आदी बाबींसाठी निधी लागतो त्यामुळे ग्राम पंचायत ही गावांतील पथदिवे यांची थकीत बिल भरू शकत नाही.

पंचायत समिती स्तरावरून ग्राम पंचायत च्या स्व निधीतून गावातील पथदिवे यांची बिल भरण्यास पत्रव्यवहार केल्या जात आहे परंतु ग्राम पंचायत ला संगणक परिचालक मानधन व अन्य विकास कामांसाठी अल्प निधी असून सदर १५ वा वित्त आयोग निधी कमी असतो त्यामधून विकास कामे करायची की बिल भरायची असा प्रश्न सरपंच अरविंद राऊत यांनी केला आहे.अनेक वर्षांपासून गावांतील पथदिवे यांची बिले पंचायत समिती स्थरावर भरल्या जात होती आणी आता लाखोंच्या घरात थकीत बिल ग्राम पंचायतला दिल्या गेली ही मनमानी ग्राम पंचायत सहन करणार नाही महाराष्ट्र सरकारने सर्व ग्राम पंचायत ची बिले माफ करावी.

मागील अनेक वर्षांपासून प्रत्येक गावात महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनी व्यवसाय करीत आहे त्यामुळे ग्राम पंचायत ला व्यवसाय कर वसूल करण्याचा अधिकार आहे गावांतील ग्राहक संख्येनुसार विद्युत कंपनीने ग्राम पंचायत ला व्यवसाय कर द्यावे त्या बाबतचा ठराव येणाऱ्या १५ ऑगस्ट च्या ग्राम सभेत घेतल्या जाणार असून आधी विद्युत कंपनीने व्यवसाय कर द्यावे नंतर आम्ही बिल भरू अशी प्रतिक्रिया अरविंद राऊत यांनी दिली असून बद्धलचा ठराव व निवेदन मुख्य कार्यकारी अभियंता विद्युत विरण कंपनी महाराष्ट्र राज्य ,आमदार चिमूर विधानसभा क्षेत्र, संवर्ग विकास अधिकारी चिमूर यांना देण्यात येणार असल्याचे सरपंच अरविंद राऊत यांनी सांगितले.