कर्जाला कंटाळून शिबला येथील युवा शेतकऱ्याची आत्महत्या

✒साहिल महाजन ✒
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी
7262025028
यवतमाळ : – झरी जामनी तालुक्यातील कर्जाला कंटाळून शिबला येथील शेतकरी लखू अडकू पुसाम(40)या युवा शेतकऱ्यानि 3 आगस्ट ला आपल्या शेतात दुपारी बारा वाजताच्या सुमारास विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटनेने एकच खळबळ उडाली आहेत.सविस्तर वृत्त असे कि,शेती आणि शेतीपूरक व्यवसायासाठी लखू ने बँकांकडून कर्ज काढलं होतं.मागील चार वर्षांपासून शेतीचे उत्पादन न झाल्याने बँकांचा कर्जवसूली थकीत होती,वारंवार बँकेकडून कर्ज भरण्याची तगादा लावण्यात येत होता. परंतु सतत चार वर्षपासून शेती व्यवसायात उत्पादन घट असल्यामुळे बंकेचे कर्ज भरू शकला नाही.तसेच लखू च्या शेतातून तलावाचे कॅनॉल जाऊन असल्यामुळे कॅनॉल चे पाणी सदर शेतामध्ये झिरपत असल्यामुळे व पावसाळ्यात आलेले पाणी कालव्याने न जाता ते शेतातच साचत असल्यामुळे उत्पादनमध्ये घट होत होती, त्या संदर्भात अनेकदा उपविभागीय अभियंता सिंचन विभागात रीतसर तक्रार करण्यात आले,तसेच तहसीलदार मार्फत पालकमंत्री यांना ही निवेदन देण्यात आले परंतु सबाधित विभागाकडून कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही.वीस वर्षांपासून लखू व त्याचा मोठा भाऊ मंगल शेती करीत होते.परिणामी मागील काही वर्षात उत्पादन झाले नाही. घरची परिस्थिती हालाखीची असल्यामुळे म्हतारी आई, मुलाचे शिक्षण, इतर गरजा भागविणे कठीण झाले,आणि कर्जवसूलीसाठी बॅकेकडून तगादा वाढला होता. कर्ज वसूलीचा वाढता ताण सहन न झाल्याने लखू पुसाम यांनी शेतात जाऊन विष पिऊन आत्महत्या केली.
त्याच्यामागे दोन मुले, पत्नी असा आप्त परिवार आहेत. या घटनेनंतर पुसाम कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. राज्यसह जिल्यात व तालुक्यात शेतकरी आत्महत्या वाढतच आहेत.आत्महत्यांची आकडेवारी, कारणे, सरकारी पॅकेज वगरे विषयांवर सातत्याने चर्चा आणि आंदोलने सुरू असतात; परंतु आत्महत्या थांबत नाही.याला जबाबदार कोण शेतकरी, प्रशासन कि परिस्थिती जिल्यात शेतकऱ्यांसाठी अनेक योजना येतात परंतु त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहचत नाही. कुठेतरी प्रशासन कमी पडत आहेत. या विषयावर प्रशासनाने गंभीर दखल घेणे गेरजेचे आहे. लोकप्रतिनिधी यांनी सुद्धा याकडे गांभीर्याने पाहणे महत्वाचे आहे.
अशातच यवतमाळच्या दीनदयाल बहुउद्देशीय प्रसारक मंडळाने या कुटुंबाच्या पाठीशी उभे राहून त्यांना जगण्याचा आत्मविश्वास देण्याचे जे कार्य सुरू केले त्याला तोड नाही. त्यांना त्यांच्या आवड व गरजेनुसार शेतीपूरक उद्योग, शेळीपालन, पीठगिरणी, कापड दुकान इत्यादी व्यवसाय थाटून दिले आहेत. आतापर्यंत १२० शेतकरी विधवांना स्वयंपूर्ण करण्यात ‘दीनदयाल’ने जी भूमिका वठविली ती वृत्ती साऱ्याच समाजाने आत्मसात केली पाहिजे. घेणाऱ्यांनीही आता देणाऱ्याचे हात घेतले पाहिजे.असे प्रतिपादन दीनदयाळ चे प्रकल्प समन्वयक पुनाजीत कुळमेथे यांनी केले आहे.