*चिमूर शहरात अस्वच्छता तर नाल्या उपसा कडे दुर्लक्ष -पप्पू शेख*

त्रिशा राऊत
चिमूर तालुका प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यूज चंद्रपूर
Mo 9096817953
चिमूर : – चिमूर नगर परिषद च्या पहिल्या पंचवार्षिक चा कार्यकाळ संपल्यानंतर नगरसेवक वर्गाचे दुर्लक्ष होत असल्याने प्रशासन चा मनमानी कारभार मुळे शहरातील अस्वच्छता वाढली असून नाल्या उपसा होत नसल्याने आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे त्यामुळे नगर परिषद ने दखल घेऊन शहरातील स्वच्छता करून नाल्या उपसा करण्याची मागणी युवक कांग्रेस पक्षाचे पप्पू शेख यांनी करीत नगर परिषद मध्ये अधीक्षक , आरोग्य व पाणी पुरवठा अभियंता ची पदे रिक्त असल्याने रिक्त पदे भरण्याची मागणी सुद्धा केली आहे.
नगर परिषद ला प्रभारी मुख्याधिकारी असल्याने येथील कारभार मनमानी ने होत असून स्वच्छते कडे लक्ष देत नसल्याने अस्वच्छता वाढली आहे. शहरातील नाल्या उपसा करणे बंद आहे पावसाळा सुरू होत आहे नाल्या उपसा करणे गरजेचे असताना सुद्धा दुर्लक्षित होत आहे नगर परिषद मध्ये अधीक्षक, आरोग्य व पाणी पुरवठा अभियंता ही पदे रिक्त असल्याने विकास कामा कडे दुर्लक्ष होत असून पाणी पुरवठा, स्वच्छता अभियान कडे दुर्लक्ष होत आहे.
न.प.ला कायमस्वरूपी मुख्याधिकारी नसल्याने विकास कामे होत नाही तेव्हा शासनाने कायमस्वरूपी मुख्याधिकारी देऊन नप ने स्वच्छता व नाल्या उपसा करण्याची मागणी करीत नगर परिषद मध्ये अधीक्षक ,आरोग्य व पाणी पुरवठा अभियंता रिक्त पदे भरण्याची मागणी युवक कांग्रेस चे पप्पू शेख यांनी केली आहे.