स्मशानभुमीवरील वहीवाट असलेली अतीक्रमीत जागा सोडण्यास शेतकऱ्यांनकडून विरोध*

*स्मशानभुमीवरील वहीवाट असलेली अतीक्रमीत जागा सोडण्यास शेतकऱ्यांनकडून विरोध*

स्मशानभुमीवरील वहीवाट असलेली अतीक्रमीत जागा सोडण्यास शेतकऱ्यांनकडून विरोध*
स्मशानभुमीवरील वहीवाट असलेली अतीक्रमीत जागा सोडण्यास शेतकऱ्यांनकडून विरोध*

त्रिशा राऊत
चिमूर तालुका प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यूज चंद्रपूर
Mo 9096817953

तळोधी बाः
तळोधी बा.स्मशानभुमीचे वाँलकंपाउड बांधकाम करण्यासाठी ३५ लाख रूपये किंमतीच्या निधी उपलब्ध झालेला असताना सिंमाकनानुसार वाँलकंपाउडचे बांधकाम होत नसल्याने गावकरी लोकांनी बांधकाम थांबून स्मशानभुमीचे जागा मोजण्याची मागणी केली असता डिसेंबर महिण्यात प्रशासक व सचीवानी भुमीअभिलेख कार्यालयात पैसे भरुन स्मशानभुमीची जागा मोजण्यात आली.भुंमापन क्र २४६,२४७ गटात मोजणी नुसार सिमांकन करण्यात आली.पंरतु भु मापन क्र २४७ गटामधील ३३ आर जागेत तळोधी बा.येथील सुनिल नागरे व सुधीर नागरे यांनी उन्हाळी धान रोवणी केली असल्याने पिके निघाले नंतर जागा मोकळी करुन देऊ असे म्हणाले होते .मात्र आज २५ तारखेला तळोधी बा.ग्रामपंचायतचे सरपंच ,उपसरपंच व सचीव व सर्व पदाधिकारी भु मापन गट क्र २४७ जागेवर असलेल्या ३३ आर जागेवर सिंमाकन करण्यासाठी गेले असता शेतकरी सुधीर नागरे व सुनील नागरे यांनी ३३ आर जागा ही अधिकार अभिलेख नुसार गवती कुरण चराई ची आहे व त्या जागेवर आमचा कब्जा असून स्मशानभुमीची जागा नाही ,अनेक वर्षापासून वहिवाट करित असल्याने जागा सोडण्यास शेतकऱ्याने विरोध दर्शविला मात्र त्यामुळे लोकहिताच्या दृष्टीने ग्रामपंचायत सरपंच सौ.छाया मदनकर व उपसरपंच राजू घिये व सर्व पदाधिकारी वर्ग यांनी सातबारा प्रमाणे स्मशानभुमीची जागा येत असून याठिकाणी अंत्यसंस्कार करण्यासाठी जागा असल्याने ती जागा उपलब्ध करण्यासाठी ग्रामपंचायतचे सचीव व्हि.के.रायपुरे यांनी शासन स्थळावर पत्रव्यवहार करुन स्मशानभुमीच्या जागेची रितसर जागा कोणती यांचा न्याय लावून सिंमाकन करावे अशी पदाधिकारी यांनी मागणी केली .यावेळी सरपंच सौ.छाया मदनकर,उपसरपंच राजू घिये ,सचीव व्हि.के.रायपुरे,सदस्य सुधाकर कामडी,ग्रा.प.सदस्य डोनु पाकमोडे ,सदस्य जिवेश सयाम,सदस्य सोनु नंदनवार ,सदस्य सौ.विजया वाढई,सदस्या सौ.शालू ताटकर सदस्य सौ.चचाणे सदस्य सौ.मडावी याची यावेळी उपस्थिती होती .