स्थानिक बँक मित्रावर बाळा जगताप यांचा प्रहार; दिशाभूल करून नागरिकांना लावला करोडो रुपयाचा चुना बाळा जगताप यांनी आणले प्रकरण उघडकीस

स्थानिक बँक मित्रावर बाळा जगताप यांचा प्रहार; दिशाभूल करून नागरिकांना लावला करोडो रुपयाचा चुना बाळा जगताप यांनी आणले प्रकरण उघडकीस

स्थानिक बँक मित्रावर बाळा जगताप यांचा प्रहार* (दिशाभूल करून नागरिकांना लावला करोडो रुपयाचा चुना बाळा जगताप यांनी आणले प्रकरण उघडकीस)
स्थानिक बँक मित्रावर बाळा जगताप यांचा प्रहार; दिशाभूल करून नागरिकांना लावला करोडो रुपयाचा चुना बाळा जगताप यांनी आणले प्रकरण उघडकीस

प्रा.अक्षय पेटकर
वर्धा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
9604047240

आर्वी:- येथील एका स्थानिक बँक मधील बँक मित्र गेल्या काही दिवसांपासून नागरिकांची दिशाभूल करून त्यांची आर्थिक लुटमार करीत होता. सदर बँक मध्ये कुणी ग्राहक कर्जाचे पैसे, कर्जाचे हफ्ते किंवा पैसे डिपॉझिट करण्याकरिता आला असता सदर बँक मित्र आपल्या चलाखीने ते पैसे भरून घेत होता. ग्राहकाला पैसे भरल्याची बिगर शिक्याची पावती देऊन संपूर्ण पैसे है स्वतः हडप करीत होता. त्याचप्रमाणे कुणी ग्राहक आपले आधार कार्ड अपडेट करण्याकरिता येत असल्यास ग्राहकाचे खात्यामधील पैसे आधार कार्ड च्या माध्यमातून काढत असे. याप्रकारे या बँक मित्राने करोडो रुपयांचे गबन केल्याची शक्यता नाकारता येत नाही. सदर वार्ता जेव्हा प्रहार चे नेते बाळा जगताप यांच्या पर्यंत पोहचली तेव्हा संपूर्ण प्रकरणाची शहनिषा करण्याकरिता बाळा जगताप बँक मध्ये गेले असता.. बाळा जगताप यांनी त्या बँक मित्राला संपूर्ण प्रकरणाबद्दल विचारणा केली. मात्र बँक मित्राने उडवाउडवीची उत्तरे देण्याचा सपाटा चालू केल्यामुळे संतप्त झालेल्या बाळा जगताप यांनी त्या बँक मित्राला चांगला चोप दिला.. व लवकरात लवकर ज्यांचे ज्यांचे पैसे आजपर्यंत हडप केले त्या सर्वांचे पैसे त्यांना परत करून पुन्हा असे व्हायला नको असे ठणकावून सांगितले. संपूर्ण प्रकरासंदर्भात बाळा जगताप यांनी बँक मॅनेजर यांच्याशी चर्चा करून संपूर्ण प्रकरण उघडकीस आणले. त्या बँक मित्रावर बँकेच्या वतीने कार्यवाही कर्वी अश्या स्वरूपाच्या सूचना सुद्धा केल्या. या प्रकरणात ज्यांचे ज्यांचे पैसे त्या बँक मित्राने हडप केले असे सर्व लोक पोलिस स्टेशन तक्रार दाखल करणार आहे.
आज संपूर्ण आर्वी शहरात बाळा जगताप यांनी बँक मित्रावर केलेल्या प्रहारचीच चर्चा होती.