दामपुर येथे पारंपरिक पद्धतीने जागतिक आदिवासी दिन गावकऱ्यांच्या उपस्थित उत्साहात साजरा
ता.प्रतिनिधी मुलचेरा/
महेश बुरमवार
मो.न.9579059379
मुलचेरा – तालुक्यातील दामपुर येथे आज दिनांक 09/08/2022 रोजी जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला..
सविस्तर वृत्त असे की दुस-या महायुद्धातील चटके सहन केल्यानंतर सगळीकडे जागतिक शांतता, सर्व देशांमध्ये पारंपारिक मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करणे, एकमेकांचे अधिकार व स्वातंत्र्य जपणे, गरिबी हटविणे, शिक्षण व आरोग्य या विषयांवर मोठ्या प्रमाणात विचारमंथन झाले. या विचारांचे प्रमुख उद्दिष्ट समोर ठेवून २४ ऑक्टोबर १९४५ मध्ये संयुक्त राष्ट्र संघाची निर्मिती करण्यात आली. आज संयुक्त राष्ट्र संघामध्ये अमेरिका, रुस, चीन, फ्रांस, इंग्लंड, भारत असे एकूण १९२ देश सदस्य आहेत. आपल्या स्थापनेस ५० वर्ष पूर्ण झाल्यानंतर संयुक्त राष्ट्र संघाच्या असे लक्षात आले कि २१ व्या शतकात ज्याला आपण तंत्रज्ञानाचे युग, संगणकाचे म्हणतो…., त्या युगात जगातील वेगवेगळ्या युग असे देशांमधील आदिवासी समाज उपेक्षितांचे जीवन जगत आहे. गरिबी, अज्ञान, आरोग्य सुविधांचा अभाव, बेरोजगारी, मजुरी अशा अनेक समस्यांनी आदिवासी समाज ग्रासलेला आहे. या विळख्यातून त्याला बाहेर पडायला संधी मिळण्याची शक्यता अधिकच अस्पष्ट आहे. त्यामुळे संयुक्त राष्ट्र संघाने आदिवासी समाजाच्या समस्या सोडविण्याच्या दृष्टीकोनातून सन १९९४ पासून ९ ऑगस्ट हा दिवस “जागतिक आदिवासी दिवस” म्हणून साजरा करण्याची घोषणा आपल्या महासाभेतून सर्व सहभागी देशांना केली. त्यानंतर संपूर्ण जगात मग अमेरिका असो इतर आदिवासी समाज असलेले देश असोत त्यात भारताचाही समावेस आहे… या सर्व ठिकाणी मोठ्या उत्साहाने जागतिक आदिवासी दिवस साजरा करण्यात येवू लागला.
भारतातील आदिवासी समाजाच्या गावातील बिरसा मुंडा चौक येथे सर्व गावकरी एकत्र येऊन , कार्यक्रमात सहभागी झाले. आद्य क्रांतिकारक व आदिवासी देव दैवत यांची पुजन करून ध्वजारोहण करण्यात आले..दामपुर येथील जेष्ठ नागरिक श्री सत्यनारायण जी आत्राम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी गावातील स्त्रिया, पुरुष आदिवासी पारंपरिक वेशभूषेत उपस्थित होते…