माणगाव उपजिल्हा रुग्णालयात आकडी व घाम आल्याने एका महिलेचा उपचार दरम्यान महिलेचा मृत्यू
✍सचिन पवार✍
माणगाव तालुका प्रतिनिधी
📞8080092301📞
माणगाव :-माणगांव तालुक्यातील मुठवली तर्फे तळे गावातील जान्हवी धनाजी निवळे दिनांक ०८/०८/२०२२ या गर्भवती असताना त्यांना माणगाव उपजिल्हा रुग्णालयात नेले असता त्यांचे सिजेरियन होऊन बाळासह जनरल वॉर्ड मध्ये ठेवण्यात आले होते. परंतु त्या बेड वरून उठून बसत असताना दिनांक ०९/०८/२०२२ रोजी ०६.०५ वाजण्याच्या सुमारास त्यांना अचानक आकडी व भरपूर घाम सुटल्याने तेथील डॉक्टरांनी तिच्यावर उपचार करत असताना त्या उपचार दरम्यान मयत झाल्या तसे डॉक्टरांनी मयत झाल्याचे घोषित केले असता सौ सुवर्णा अंकुश साळवी राहणार/ पिटसई कोंड/ तालुका /तळा यांनी माणगाव पोलीस ठाण्यात खबर दिले असता पुढील तपास पोलीस दोडकुरकर /पोलीस तोरवे/पोलीस गायकवाड, करत आहे