माणगांव मध्ये चोराचा सुळसुळाट राहत्या घरातून सोन्याचा राणी हार लंपास

माणगांव मध्ये चोराचा सुळसुळाट राहत्या घरातून सोन्याचा राणी हार लंपास

माणगांव मध्ये चोराचा सुळसुळाट राहत्या घरातून सोन्याचा राणी हार लंपास

✍सचिन पवार ✍
माणगांव तालुका प्रतिनिधी
📞८०८००९२३०१📞

माणगांव :-रायगड जिल्ह्यातील माणगांव येथील कचेरी रोड येथे एका अज्ञात इसमाने राहत्या घरातील फिर्यादी याच्या कपाटात ठेवलेले दागिने पैकी एक सोन्याचे राणी हार लंपास केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असं की माणगांव कचेरी रोड येथील इसरत प्लाझा सी विंग रूम नं ४११ येते फिर्यादी विधी भारत खराडे वय वर्ष ४५ व्यवसाय ब्युटी पार्लर हिने ६२ हजार रुपयाचा किमतीचा एक ३४ ग्राम सोन्याचा राणी हार हा कपाटात ठेवला होता परंतु एका अज्ञात इसमानी दि.४/८/२२ रोजी दुपारी १२.४५ ते १.४५ मिनिटाच्या दरम्यान अज्ञात चोरट्यानी फिर्यादी याच्या राहत्या घराचे बंद दरवाजाचे लॉक उघडून घरात प्रवेश करून बेडरूम मधील कपाट खोलून मेन दरवाजा उघडून बेडरूम मध्ये असलेल्या कंपाट खोलून त्यातून फिर्यादी याचे सोन्याचे राणी हार स्वतःच्या फायद्या करिता लंपास केला आहे.

फिर्यादी विधी भारत खराडे हिने ६ दिवस सोन्याच्या राणी हाराचा शोध घेतला परंतु तिला तिचा हार सापडला नसल्याने फिर्यादीने आज दि.९ ऑगस्ट रोजी माणगांव पोलीस स्टेशनं ला तक्रार नोंदवली असता कॉ. गु. रजि. नं. २३०/२०२२ भा. द. वि. स. कं. ३५४,३८० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरील तपास माणगांव पोलीस स्टेशनंचे स. पो.निरीक्षक श्री. लहागे,पो हवालदार तोरवे, पोसई. गायकवाड,हे करित आहेत.