भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त आरोग्य शिबीर व महिला मेळावा संपन्न

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त आरोग्य शिबीर व महिला मेळावा संपन्न

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त आरोग्य शिबीर व महिला मेळावा संपन्न

जळगांव प्रतिनिधी :खंडू महाले मो.7796296480

जळगाव शहरमहानगरपालिका व RL हॉस्पिटल जळगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने बचत गटातील महिलांसाठी आरोग्य शिबीर व महिला मेळावा संपन्न झाला. दि.१०ऑगस्ट २०२२ रोजी वेळ दु. १२ वा. दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान मनपा जळगाव अंतर्गत शहरातील बचत गटाच्या महिलांसाठी महिला मेळावा व आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते सदरच्या शिबिरामध्ये महिलांना मार्गदर्शन मा.सौ. जयश्रीताई महाजन महापौर यांनी केले अध्यक्षीय भाषणात सांगितले कि भारतीय स्वातंत्र्य लढ्यात महिलांचे योगदान व देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी अनेक अशा महिलांनी लढा दिला व स्वातंत्र्य चळवळीत मोलाची भूमिका बजावली आहे असे सांगितले तसेच .मा.डॉ.विद्या गायकवाड आयुक्त, यांनी देखील महिलांना मार्गदर्शन केले कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती मा.श्री. शाम गोसावी अतिरिक्त आयुक्त,मा. श्री.चंद्रकांत वानखेडे मुख्य लेखा अधिकारी, मा. श्री.अभिजित बाविस्कर उपायुक्त कार्यक्रमास यांची उपस्थिती होती सदरच्या शिबिरामध्ये RL हॉस्पिटल जळगाव यांच्याकडील डॉ.अजय हरदास,डॉ.सुरज भूतळा, डॉ.राहुल सूर्यवंशी,डॉ. निशांत पाटील, डॉ.प्रेषित बालसाने यांनी महिलांच्या विविध आजाराची तपासणी व कॉन्सालींग मोफत केले त्यामध्ये शुगर तपासणी ,उच्च रक्तदाब तपासणी,ईसीजी तपासणी,महिलांचे पाळी संबंधित आजार इत्यादी. तपासण्या करण्यात आल्या सदर तपासणी मध्ये १७० महिलांनी लाभ घेतला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. नितीन जोशी समुदाय संघटक यांनी केले प्रास्ताविक सौ.गायत्री पाटील व्यवस्थापक यांनी केले आभार श्री.शालिग्राम लहासे व्यवस्थापक यांनी केले कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी श्री.अब्बास तडवी, श्री राहुल बडगुजर, श्री.अमोल भालेराव, श्री.राजेश गडकर, सौ.आशा चौधरी,सौ.कविता जाधव,सौ.शीतल कंखरे,श्री.भाऊलाल ठाकरे, श्री.हिरामण सपकाळे यांनी परिश्रम घेतले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here