निसर्गाचा वक्रदृष्टीमूळे बेघर झालेल्या लक्ष्मणच्या कूटूंबीयांना भाजपा च्या पदाधिकाऱ्यांकडून एक हात मदतीचा
शरद कुकुडकार
गोंडपिपरी तालुका प्रतिनिधी
मो.न.9518727596
यंदा पावसाचा तांडवामूळे अनेकांचे छत्र नाहीसा होत आहे.कच्चे घर असलेल्यांना भिषण संकटांना समोर जावं लागत आहे.
यातच गोंडपिपरी तालुक्यातील आदिवासी गाव असलेले गणपूर येथील श्री लक्ष्मण नैताम यांच घर पडून मोठ संकट ओढावले.
गणपूर येथील कार्यकर्त्यांनी हि माहिती माजी जि.प.सदस्य श्री अमर बोडलावार यांना दिली ,माहिती मिळताच विलंब न करता गणपूर गाठून अमर बोडलावार यांनी कूटूंबाची सांत्वन केली. व अन्नधान्य किट उपलब्ध करून दिले.वेळप्रसंगी मदतीबद्दल लक्ष्मणच्या कूटूंबीयांनी त्यांचे आभार मानले.
त्यावेळेस तिथे गणपूरचे ग्रा पं सदस्य अनिल आत्राम, भारत दूशटवार,परमपूज्य शेषराव महाराज व्यसन मुक्त समितीचे अध्यक्ष गणपती चौधरी,भाजपाचे तालूका अध्यक्ष बबन निकोडे,तसेच गावकरी उपस्थित होते.