35 वर्षे रखडलेल्या गल्लीतील कामाची दिल्लीत दखल, श्री प्रकाश विचारे यांच्या प्रयत्नाला यश.

35 वर्षे रखडलेल्या गल्लीतील
कामाची दिल्लीत दखल,
श्री प्रकाश विचारे यांच्या
प्रयत्नाला यश.

35 वर्षे रखडलेल्या गल्लीतील कामाची दिल्लीत दखल, श्री प्रकाश विचारे यांच्या प्रयत्नाला यश.

शहानवाज मुकादम
रोहा शहर प्रतिनिधी
मो.7972420502
दि:10/08/2022.

रोहा: ऊसर पांगळोली चणेरे सुपेगाव मार्गे मुरुड या रस्त्या कामी सी.एस्.टी.ला असणार्‍या पी.डब्ल्यु.डी.च्या कार्यालयात असणार्‍या पंतप्रधान ग्राम सडक योजनेच्या विभागात ज्येष्ठ समाज सेवक श्री प्रकाश विचारे गेले असता तेथील माहिती प्रमाणे या कामी पाच कोटीचा निधी पंतप्रधान कार्यालयातुन दिला आहे. म्हणजे आपण वर्षाभरा पुर्वी केलेल्या व पस्तीस वर्षे रखडलेल्या गल्लीतील कामाची दिल्लीत दखल घेतली गेली हे नक्की झाले आहे.
१९९५ साली औरंगाबाद-पुणे-रोहे- ऊसर -चणेरे मार्गे मुरुड व अलिबाग हा रस्ता राज्य महामार्ग घोषित झाला होता नंतर हाच रस्ता जिल्हा परिषदे कडे वर्ग करण्यात आला. गेली 35 वर्षे हा रस्ता रखडला आहे. त्याची दखल घेण्याची विनंती चणेरे चे ज्येष्ठ समाज सेवक व अश्वत्थामा जेष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष श्री प्रकाश विचारे यांनी या रस्त्या बाबतचे निवेदन देवुन पंत प्रधान ग्राम सडक योजनेतुन या अर्धवट राहिलेल्या रस्त्याचे काम पु्र्ण करावे अशी विनंती पत्र ठेट पंत प्रधान मोदींना दि:१२/०७/२०२१ रोजी पाठविले होते.त्याचे प्रत्युत्तर दि:२/०८/२०२१ रोजी म्हणजेच २१ दिवसात आले श्री.मोदींनी दखल घेवुन “मुख्य सचिव ” महाराष्ट्र सरकार यांना या कामा बाबत कार्यवाही करण्याचे निर्देश देवुन केलेली कार्यवाही निवेदकाला कळवुन त्याची एक प्रत पंत प्रधान कार्यालयास देण्याच्या सुचना PMO पंतप्रधान कार्यालयाने दिल्या होत्या. दि: २०/०८/२०२१ रोजी श्री प्रकाश विचारे यांनीही मुख्य सचिव महाराष्ट्र यांना पत्र लिहून या रस्त्त्याची सद्यास्थिती काय आहे कळावावे अशी विनंती केली होती.
या रसत्या मुळे रोहा अलिबाग व मुरूड तालुक्यातली अनेक गावे,
वाड्या व पर्यटन स्थळे जवळ येणार आसलेने श्री प्रकाश विचारे सर यांच्या या प्रयत्नाला यश मिळाले आसुन त्यांचे चणेरे विभागात श्री
मन्नान अ धनसे सह अनेकांकडून चोहो बाजुस आभार व्यक्त होत आसले चे दिसुन येत आहे.