हर घर तिरंगा अभियान अंतर्गत शहरात भव्य रॅली
: ना ना मुंदडा विद्यालयाचा उपक्रम
वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय उत्तम पडघान✍
🪀7350050548🪀
वाशिम: -स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्त आजादी का अमृत महोत्सव हा कार्यक्रम वर्षभर शाळा स्तरावर व देश पातळीवर साजरा करण्यात येत आहे त्यानुसार आज हर घर तिरंगा या अभियाना अंतर्गत जनजागृती करण्यासाठी ना ना मुंदडा विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आज दि 10 ऑगस्ट रोजी भव्य रॅली चे आयोजन केले होते.
संपूर्ण देश पातळीवर हर घर तिरंगा अभियान राबविण्यात येत आहे त्यानुसार दिनांक 13, 14 आणि 15 ऑगस्ट या तीन दिवशी शासकीय कार्यालयात तसेच प्रत्येक घरावर भारताचा झेंडा फडकविण्यात येणार आहे त्याच्या जनजागृतीसाठी शासनाच्या आदेशानुसार शहरातून भव्य रॅली काढण्यात आली. ना ना मुंदडा विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ही भव्य रॅली काढली या रॅलीला ना ना मुंदडा विद्यालयाचे प्राचार्य श्री सुनील राठी यांनी हिरवी झेंडी देऊन सुरुवात केली ती रॅली अकोला फाटा येथून माळी वेटाळ पांडे वेटाळ गांधी चौक जोगदंड हॉस्पिटल मार्गे पुन्हा मुख्य रस्त्याने शाळेमध्ये आणण्यात आली त्यावेळी भारत माता की जय वंदे मातरम या घोषणा देऊन घरोघरी झेंडा लावण्याचे आवाहन विद्यार्थ्यांनी केले . ती रॅली शाळेमध्ये आल्यानंतर मानवी साखळीच्या साह्याने विद्यार्थ्यांनी भारताचा नकाशा तयार केला त्यामध्ये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत 75 वर्षे पूर्ण झाल्यामुळे 75 या अंकाची मानवी साखळी तयार करण्यात आली त्यानंतर हर घर तिरंगा अभियानाचे गीत व नृत्य विद्यार्थ्यांनी सादर केले रॅलीला नाना मुंदडा विद्यालयाचे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी ,प्राध्यापक तसेच मालेगाव पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांनी सहकार्य केले .✍