राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युवक-युवती विचार मंच महाराष्ट्र राज्याचे तिसरे राज्यस्तरीय अधिवेशन १३ ऑगस्टला

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युवक-युवती विचार मंच महाराष्ट्र राज्याचे तिसरे राज्यस्तरीय अधिवेशन १३ ऑगस्टला

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युवक-युवती विचार मंच महाराष्ट्र राज्याचे तिसरे राज्यस्तरीय अधिवेशन १३ ऑगस्टला

✍ *हर्षल राजेंद्र पाटील* ✍
📰 *मोर्शी तालुका प्रतिनिधी* 📰
📱 *8600650598* 📱

*हिवरखेड ( तिवसा ) * : – *विविध कार्यक्रमांचे आयोजन* राष्ट्रपिता व राष्ट्रसंताची प्रदीर्घ भेटीच्या ८६ व्या वर्षानिमित्त राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युवक-युवती विचार मंच महाराष्ट्र राज्य द्वारे ३ रे राज्यस्तरीय अधिवेशनाचे आयोजन सेवाग्राम वर्धा येथील नई तालीम परिसरात १३ व १४ ऑगस्टला करण्यात आले आहे. या निमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.

राज्यस्तरीय अधिवेशनाचे उद्घाटन १३ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता होईल. दुपारी ०३ वाजता प्रथम सत्र शुरु होइल. याप्रसंगी संघटन का व कशाकरिता या विषयावर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युवक, युवती विचार मंचचे प्रेमकुमार बोके मार्गदर्शन करतील. सायंकाळी ०६ वाजता बापुकुटी आश्रम प्रार्थना, सायंकाळी ०७ वाजता गटचर्चा, रात्री ०९ वाजता काव्य सम्मेलन आयोजित करण्यात आले आहे. १४ऑगस्टला सकाळी ०५ वाजता जागरण, सकाळी ०५.३० वाजता सामुदायिक ध्यान, सकाळी ०६ वाजता रामधुन काढून बापुकुटी चे दर्शन घेण्यात येईल. सकाळी ०९ वाजता ओजस सुनीती व सुमित उगेमुगे,तथा ११.३० वाजता मार्गदर्शन कार्यकर्ता घडतांना या विषयावर रवी दादा मानव यांचे मार्गदर्शन होईल. दुपारी ०१.३०वाजता समारोप सत्र आयोजित केले असून कोविड योद्धाचा सत्कार करण्यात येईल. त्यानंतर राष्ट्रवंदना होईल. अधिक माहितीकरिता अमर वानखडे, अनुप देशमुख, चेतन परळीकर, जानवी राऊत यांच्याशी संपर्क करावा,व जास्तीत जास्त संख्येने सर्वच सदस्यांनी या राज्यस्तरीय अधिवेशनाला उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युवक युवती विचार मंच अमरावती मार्गदर्शक हेमंत टाले जिल्हाध्यक्ष प्रशांत सुरोषे सचिव गणेश गहुकर संपर्क प्रमुख अनुप देशमुख गोपाल सलोडकर रोशन ठाकरे पवन खरासे प्रमोद बोराळकर पंकज पांडे प्रवीण निपाणे यांनी केले आहे