कोरपावली ग्रामपंचायत मार्फत जागतिक आदिवासीदिन मोठ्या उत्साहात साजरा
✒️ सुपडू संदानशिव
यावल तालुका प्रतिनिधी
📱9561200938📱
यावल – तालुक्यातील अनेक गावांमध्ये तसेच जवळच कोरपावली येथे आदिवासी बांधव हे मोठ्या संख्येमध्ये असून गुण्या गोविंदाने नांदत आहेत, आज 9 ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिनानिमित्त कोरपावली सरपंच श्री. विलास अडकमोल यांच्या हस्ते कोरपावली ग्रामपंचायत मार्फत जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.
या दिनाचे औचित्य साधून सरपंच अडकमोल यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर, तंट्या मामा भिल, खाजा नाईक या महापुरुषांच्या फोटोला माल्यार्पण करण्यात आले. तसेच कोरपावली येथील अल्ताफ तडवी यांनी भोपाल येथे जागतिक आदिवासी परिषद मध्ये भाग घेतल्याने व त्यांच्या आदिवासी तडवी भिल्ल भाषेतील कवितेची दखल तेथे घेतल्याने त्यांचा सत्कार ग्राम पंचायतिच्या वतीने करण्यात आला.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुनाफ जूम्मा तडवी यांनी आपले मनोगत मांडले व त्यांनी लिहिलेली तडवी भाषेतील प्रतिज्ञा ही सर्वांनी घेतली. सदर कार्यक्रमास सरपंच विलास अडकमोल, ग्रामपंचायत सदस्य सत्तार तडवी, आरिफ तडवी, दिपक नेहते जुम्मा तडवी, ग्रामपंचायत लिपिक किसन तायडे, शिपाई सलीम तडवी तसेच ग्रामस्थ सलीम तडवी, फिरोज तडवी, नबाब तडवी व मोठ्या संख्येने गावातील आदिवासीं बांधव उपस्थित होते.