माहूर नं.प.चे कर्तव्यदक्ष नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांच्याकडून भाविकांसाठी महाप्रसादाचे वाटप
आदित्य खंदारे
माहूर प्रतिनिधी
7350030243
माहूर :- नारळी पौर्णिमा निमित्त परिक्रमा यात्रा काळात माहूर श्री दत्त चौक येथे टि पॉईंट दिनांक ९ ऑगस्ट २०२५ रोजी भाविकांच्या परतीच्या प्रवासादरम्यान माहूर नगरपंचायत चे नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांच्याकडून पाच क्विंटल खिचडीचे महाप्रसाद वाटप करण्यात आले. परिक्रमा यात्रा ही दरवर्षीप्रमाणे भाविक तब्बल १२ कोस म्हणजेच एकंदरीत ३६ कि.मी. प्रदक्षिणा घालून थकल्यानंतर परतीच्या प्रवासादरम्यान भाविकांना रुचकर मसाले भात चा मनमुराद आनंद घेतल्याने दोन ते तीन तासातच पाच क्विंटल च्या महाप्रसादाचे वाटप करण्यात आले, यावेळी उपनगराध्यक्ष ज्ञानेश्वर (नाना) लाड,ज्येष्ठ पत्रकार जयकुमार अडकिने, पत्रकार राज ठाकूर, युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे तालुकाध्यक्ष अनिल माडपेलिवार, सदस्य सदानंद पुरी, उ बा ठा ता.प्रमुख जिंतू चौले रा.श. प. पक्षाचे माहूर शहराध्यक्षअमित येवतीकर, पत्रकार गणेश खडसे, रफिक गाईड, जावेद दोसानी, सैफ दोसानी, नगरसेवक प्रतिनिधी रफिक सौदागर, सामाजिक कार्यकर्ता आकाश कांबळे, जगदीश वडस्कर, प्रवीण जाधव, स्वच्छता दूत गणेश जाधव, नगर पंचायत चे कर्मचारी संदीप गजलवाड, देविदास जोंधळे, विजय शिंदे, राहुल कांबळे, यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.