जागतिक आदिवासी दिनानिमित्त लायन्स क्लब अलिबाग तर्फे खाऊचे वाटप

जागतिक आदिवासी दिनानिमित्त लायन्स क्लब अलिबाग तर्फे खाऊचे वाटप

अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्युरो चीफ
९४२०३२५९९३

अलिबाग:- जागतिक आदिवासी दिन व क्रांती दिनानिमित्त दरवर्षी जागतिक आदिवासी दिन उत्सव समिती अलिबाग व मुरुड तालुका तर्फे अलिबाग येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसह पारंपरिक वेशभूषेत आदिवासी व ठाकूर समाज मोठया उत्साहाने साजरा करतात यावेळी कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने अलिबाग मधील रायगड बाजाराजवळ उपस्थित राहिलेल्या आदिवासी व ठाकूर समाजातील बांधव व भगिनींना “आनंद वाटल्याने वाढतो ” या भावनेतून लायन्स क्लब अलिबाग च्या वतीने रिलिव्ह द हंगर उपक्रमाअंतर्गत क्लबचे डिस्ट्रिक्ट फर्स्ट व्हाइस गव्हर्नर प्रवीण सरनाईक, अलिबाग लायन्स क्लब चे अध्यक्ष प्रदीप नाईक,क्षात्रैक्य समाज अध्यक्ष द्वारकानाथ नाईक यांच्या हस्ते खाऊचे वाटप करण्यात आले यावेळी आदिवासी समाज अध्यक्ष महादेव मेंगल व कार्याध्यक्ष भगवान नाईक यांनी आदिवासी व ठाकुर समाजास लायन्स क्लब तर्फे नेहमीच मदतीचा हात मिळत असल्याने समाधान व्यक्त केले ,हा कार्यक्रम केवळ खाऊ वाटपाचा नसून समाजातील सर्व घटकांना एकत्र आणून आपण सारे एकच हा संदेश देणारा ठरला सचिव गंगाराम मेंगल यांनी उपस्थितांचे आभार मानले यावेळी लायन्स क्लब सचिव महेश कवळे, अविनाश राऊळ, दिपक पाटील, महेंद्र पाटील, भगवान मालपाणी, नितीन शेडगे, रोहन पाटील, रमेश धनावडे, पूनम धनावडे, मिलिंद मगर इत्यादी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.