कशेळे येथे आदिवासी भवनाचा लोकार्पण सोहळा संपन्न …
खासदार श्रीरंग आप्पा बारणे व आमदार महिंद्र थोरवे यांच्या विशेष प्रयत्नातून आदिवासी भवनाचे भूमिपूजन
आदिवासी दिनाचे औचित्य साधून आदिवासी भवनाचे भूमिपूजन.
संदेश साळुंके
कर्जत रायगड प्रतिनिधी
९०१११९९३३३
कर्जत :- कर्जत तालुक्यातील कशेळे येथे आदिवासी समाजाकरिता सामाजिक सभागृह (आदिवासी भवन) भूमिपूजन शनिवार दिनांक 9 ऑगस्ट 2025 रोजी एक वाजता कशेळे येथे संपन्न झाला.
आदिवासी दिनाच्या औचित्य साधून भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. हे आदिवासी भवन नसून आदिवासीसाठी मंदिर आहे. 40 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आदिवासी समाजासाठी कर्जत कशेळे येथे प्रथमच भव्य दिव्य आदिवासी भवन उभारण्यात आले आहे.
या ठिकाणी एक ऐतिहासिक दिवस म्हणून कर्जत तालुक्यातील आदिवासी बांधवच नव्हे तर सगळ्या समाज घटकांना या आजच्या दिवसाचे एक ऐतिहासिक दिवस म्हणून स्मरण राहावं यासाठीच आज गेली कित्येक वर्ष माझ्या आदिवासी बांधवांनी
एक मनामध्ये इच्छा व्यक्त केलेली होती ती आतापर्यंत फक्त राजकीय स्वार्थासाठी आदिवासी बांधवांचा वापर केला जात होता. माझ्या समाजासाठी माझ्या हक्काचं आदिवासी भवन या कर्जत मध्ये उभे राहावं ही इच्छा माझ्या आदिवासी बांधवांनी माझ्याकडे व्यक्त केली होती.
आणि आज खऱ्या अर्थाने क्रांती दिन आणि जागतिक आदिवासी दिना दिवशी आदिवासी भवनाची इच्छा पूर्ण होत आहे. आदिवासींसाठी बिरसा मुंडा यांनी दिलेले योगदान इंग्रजांना सळो की पळो करून सोडणारा हा आदिवासी वीर त्यावेळी होता. त्यामागचा इतिहास पाहिला असता देशाला स्वातंत्र देण्यासाठी आदिवासी बांधवांचा ही मोठा वाटा आहे.
हे विसरता कामा नये. आदिवासी संपूर्ण एकवटले पाहिजे एकत्र आले पाहिजे यासाठी आदिवासी भवन उभारण्यात येणार आहे असे महेंद्र थोरवे यांनी प्रतिपादन केले.
या लोकार्पण सोहळ्यासाठी व्यासपीठावर उपस्थित मावळ लोकसभा खासदार श्रीरंग आप्पा बारणे, कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे,
संतोष भोईर, भाई गायकर, संभाजी जगताप, सुदाम पवाली , सुरेश टोकरे, तानाजी मते, शिवराम बदे, गजानन पेमारे,
सरपंच पिंपरकर, मनोहर थोरवे, परशुराम दरड, भगवान भगत, बालकृष्ण तुपे, मालू निरगुडा, जैतू पारधी, मनोहर पाधिर,
गणेश शेवाले, काशिनाथ पाधिर, पवार ताई, उषा पारधी, जयवंती हिंदोला, भास्कर दिसले ,दिलीप ताम्हणे, प्रसाद थोरवे, तसेच शिवसेनेचे अनेक पदाधिकारी व आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.