देशभरातील सलून व्यवसायिकि उद्या साजरा करणार ‘नॅशनल सलोन डे

518

देशभरातील सलून उद्या साजरा होणार ‘नॅशनल सलोन डे

प्रतिनिधी : संजय पंडीत

सलून व्यवसाय विविध प्रकारच्या रूप सौन्दर्याच्या अलग अलग सेवा देणारा प्रामुख्याने नाभिक समाजाचा पारंपरिक व्यवसाय.

आज या व्यवसायाने देखील अधुकनिकतेची सांगड घालताना काळानुरूप अनेक बदल केले आहेत. कधी काळी फक्त घराच्या ओसरीतथा गावच्या पारावर मर्यादित असलेला हा सेवा देणारा व्यवसाय आता सगळ्या सीमा पार करुन एखाद्या मोठ्या उदयोगाप्रमाणे युनिसेफ सलोन,स्पा, हेअर स्टुडिओ आदी विविध रूपात बदलला आहे.पुरुषांच्याच सेवे पुरता मर्यादित असणारा हा व्यवसाय आता महिलांसाठी देखील ब्युटी पार्लरच्या माध्यमातून विविध सेवा देऊ लागला आहे.

एकंदरीत टीव्ही, सिनेमा आणि इंटरनेटच्या या आधुनिक युगात आपल्या ग्राहकांच्या वाढत्या नवनवीन मागाण्यांचा वेळोवेळी विचार करुन सलून व्यवसायिकानी अमुलाग्र बदल केले आहेत.व्यवसायाची वाढती व्याप्ती पाहून विविध कारपोरेट कंपन्या आणि इतर समाजाने देखील या सलून पदार्पण केल्याने या व्यवसायात आता व्यवसायिक स्पर्धा पाहाव्यास मिळत आहे.याचाच भाग म्हणुन तर या व्यवसायाचे रूपांतर आता एका मोठ्या सेवा देणाऱ्या इंडस्ट्री मधे झाल्याचे सर्वत्र दिसत आहे.

असा हा पारंपरिकपण अत्यावश्यक सेवा देणारा व्यवसाय कोरोना काळात मात्र पुरता अडचणीत सापडला होता. इतर कोणतेही उत्पनाचे साधन नसल्याने देशभरातील व्यवसायिकांवर त्यावेळी उपासमारीची वेळ आली होती.आर्थिक अडचणीना त्रासून जवळ जवळ चाळीसच्या वर सलून व्यवसायिकांनी आत्महत्या केल्या होत्या. सरकारला वारंवार निवेदने, आंदोलन, तथा विनंती करुन देखील सरकार अथवा कोणताही राजकीय पक्ष सलून व्यवसायाची तथा नाभिक समाजाची दखल घेण्यास पुढे येत नव्हता.

अशातच सलून ब्युटी पार्लर व्यवसायिकांच्या न्याय हक्कासाठी”सेव्ह सलोन इंडिया” चळवळ उभी राहिली.

हळूहळू देशभरात विविध संघटनामध्ये विभागलेला सलून व्यवसायिक आपल्या हक्कासाठी सेव्ह सलोन इंडियाच्या माध्यमातून एकवटू लागला.

या दरम्यान आपल्या हक्कासाठी लढताना देशभरातील जवळ जवळ १३५ संघटना एकाच दिवशी एकत्र आल्या आणि तब्ब्ल दीड लाखाच्या वर निवेदनांच्या ईमेल सरकारला पाठविण्यात आल्या. हा ऐतिहासिक ऐक्याचा क्रांतिकारी दिवस होता ११ ऑगस्ट २०२१.

याच अभूतपूर्व दिवसाने सकल नाभिक समाजात आणि प्रामुख्याने देशभरातील सलून/ब्युटी पार्लर व्यवसायिकांत कधी नव्हे ते ऐक्य निर्माण करुन व्यवसायला एक नवीन ओळख मिळवून दिली.

तेंव्हा पासून सकल सलून व्यवसायात या दिवसाला अनण्यसाधारण महत्व प्राप्त झाले, आणि हा दिवस सामाजिक आणि व्यवसायिक ऐक्याचा प्रतीक म्हणुन देशभरात “नॅशनल सलोन डे” अर्थात “राष्ट्रीय सलून दिवस”म्हणुन सर्वत्र साजरा होऊ लागला.

अशातच दोन वर्षांपूर्वी सलून क्षेत्राशी निगडित असलेले सर्व कलाकार, तंत्रज्ञ, उद्योजक आणि नामवंत व्यवसायिक यांनी एकत्र येऊन देशव्यापी एचबीएफ(HBF) सारखे राष्ट्रीय संघटन स्थापन केल्याने देशभरातील सलून/ब्युटी पार्लर व्यवसायिक एका छत्राखाली आल्याने व्यवसायिक ऐक्यात अधिकच भर पडली आहे.

अद्याप या फेडरेशनला अपेक्षित यश जरी मिळाले तरी भविष्यात या क्षेत्राशी निगडित सर्व समश्यांचे निराकरण करुन सलून ब्युटी पार्लर व्यवसायाला यशाच्या उंच शिखरावर घेऊन जाण्याचा संकल्प असल्याचे फेडरेशनचे अध्यक्ष अशोक पालीवाल तथा प्रभारी उदय टक्के यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

उद्या ११ ऑगस्ट,

देशभरातील सलून/ब्युटी पार्लर व्यवसायीकांचा आनंदाचा आणि उत्साहाचा दिवस.या दिवशी सर्व सलून सेवकांमध्ये वेगळाच उत्साह आणि जालोश पहावयास मिळतो. या दिवशी व्यवसायिक आपली दुकाने विविध प्रकारच्या सजावटीने सजवून आपल्या ग्राहक राज्याच्या स्वागतासाठी सुशोभीत करतो.ग्राहक राज्याचे आदरतिथ्य करताना ग्राहकाला पुष्प देऊन या दिवशी मिठाई भरऊन तोंड केले जाते, आणि त्यांना या ऐतिहासिक दिवसाचे महत्व देखील सांगितले जाते.

खास बाब म्हणजे या दिवसाचे महत्व म्हणुन बरेच सलून व्यवसाईक अपल्या विभागातील जेष्ठ नागरिक,दिव्यांग ग्राहक आणि अनाथ आश्रमतील मुलांना मोफत सलून सेवा देऊन या दिवसांचा आनंद अधिक द्विगुणित करतात.

अशाप्रकारे या दिवशी देशभरातील सलून/ब्युटी पार्लर व्यवसायिक आपआपल्या संघटनांच्या माध्यमातून एकत्र येऊन या दिवशी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करतात.

या दिवशी सर्व सलून सेवक एकमेकांना ऐक्याच्या अलिंगन देऊन शुभेच्छा देतात आणि समस्त सलून/ब्युटी पार्लर व्यवसायला ऐक्याची नवीन ओळख मिळवून देणारा हा दिवस आनंदाने मोठ्या जल्लोषात साजरा करतात.सर्व सलू न सेवकांना ‘नॅशनल सलोन डे’ च्या हार्दिक शुभेच्छा  हा संजय पंडीत मसाला आहे